शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कामांना अचानक आला वेग; मनपा अधिकारी, प्रकल्प सल्लागार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 14:12 IST

आता दुभाजक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना कंत्राटदार खोदकाम न करताच दुभाजक उभारत असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : पंधराव्या वित्त आयोगाकडून महापालिकेला मिळालेल्या निधीतून शहरात १६ कोटी रुपयांचे दुभाजक उभारण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागी चार ते सहा इंच खोदकाम करून आतापर्यंत दुभाजक उभारण्यात आले. महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांची बदली होताच अंतिम टप्प्यात पोहोचलेली दुभाजकाची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, मनपा अधिकाऱ्यांनी याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.

आठ वर्षांपूर्वी खड्ड्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली होती. शासन अनुदानातून जवळपास २७४ कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार केले. मात्र, दुभाजक उभारणीचा प्रश्न होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १५व्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीतून १६ कोटींचे दुभाजक उभारण्याचा निर्णय घेतला. याचे डिझाइनसुद्धा अंतिम करण्यात आले. खासगी एजन्सीमार्फत काम सुरू केले. सिमेंट रस्ता असला तरी चार ते सहा इंच खोदकाम करूनच दुभाजक उभारण्यात आल्याचे चित्र नागरिकांनीही अनेक ठिकाणी पाहिले. विशेष बाब म्हणजे मागील काही महिन्यांपासून काम सुरळीत सुरू होते. आता दुभाजक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना कंत्राटदार खोदकाम न करताच दुभाजक उभारत असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडको एन-२ भागात हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अधिकाऱ्यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे मान्य केले.

माती टाकताच पितळ उघडेजकात नाका ते एमजीएम रोडवर महापालिकेच्या उद्यान विभागाने नवीन दुभाजकांत माती टाकली. त्यानंतर अवकाळी पाऊस आला. दुभाजकाचा शेवटचा भाग आपोआप गळून पडला. नंतर तो दुरूस्त करण्यात आला.

डिझाइनच तसे आहेकार्यकारी अभियंता बी. डी. फड यांनी सांगितले की, खोदकामाचा प्रश्नच नाही. दुभाजकाचा एक भाग सिमेंट रस्त्यावर येतो. आतील भाग थोडासा खाली आहे. दुभाजकात मोठ्या प्रमाणात स्टीलचा वापर होतोय, त्यामुळे तो पडण्याची अजिबात शक्यता नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका