तोतया पोलीस अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:38 IST2017-09-30T00:38:26+5:302017-09-30T00:38:26+5:30
तरुणाची झडती घेणाºया तोतया पोलिसाला हर्सूल पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ही घटना २९ सप्टेंबर रोजी हर्सूल टी पॉइंट येथे घडली.

तोतया पोलीस अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तरुणाची झडती घेणाºया तोतया पोलिसाला हर्सूल पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ही घटना २९ सप्टेंबर रोजी हर्सूल टी पॉइंट येथे घडली.
शेख महेमूद शेख रुस्तुम (४३, रा. चेतनानगर, हर्सूल) असे आरोपीचे नाव आहे. निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले की, तक्रारदार भरत आसाराम तुपे (२७) हा तरुण सोलापूरहून औरंगाबदेतील सिडको बसस्थानक येथे आला. तेथून तो हर्सूल टी पॉइंट येथे गेला. यावेळी तुपे हे त्यांच्या भावाची प्रतीक्षा करीत असताना आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने तक्रारदार यांना उद्देशून तू कोण आहेस, येथे काय करतो, बॅगेत काय आहे, अशी पोलिसांसारखी तो विचारणा करू लागला. तुपे यांनी त्यास बॅग उघडून दाखविली. यावेळी तुपे यांना त्याच्यावर संशय येत होता. त्याचवेळी हर्सूल पोलिसांची गस्तीवरील गाडी तेथून जात असल्याचे तुपे यांना दिसले. त्यांनी पळत जाऊन पोलिसांना थांबवून हा प्रकार सांगितला. पोलिसांनी लगेच त्याची विचारपूस सुरू केली तेव्हा तो मादक पदार्थाच्या अमलाखाली असल्याचे त्यांना समजले. तो तेव्हाही तोतयागिरी करत असल्यामुळे ताब्यात घेतले.