पडिक विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:06 IST2021-02-16T04:06:16+5:302021-02-16T04:06:16+5:30

दौलताबाद : मिटमिटा येथील गट नं. १०९ मध्ये असलेल्या पडिक विहिरीत एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे ...

The body of a young man was found in a paddy field | पडिक विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

पडिक विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

दौलताबाद : मिटमिटा येथील गट नं. १०९ मध्ये असलेल्या पडिक विहिरीत एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, दौलताबाद पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. हा मृतदेह कैलास अरुण आढाव (रा. मिटमिटा) याचा असल्याचे कुटुंबियांनी ओळखले.

मिटमिटा येथील गट. नं. १०९ मधून शेतकामासाठी जात असताना एका महिलेला दुर्गंधी आली. तिने पडिक विहिरीत डोकावून पाहिले असता, युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. भीतीपोटी या महिलेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. मात्र, जेवणाच्या सुटीत तिने ही बाब शेतमालकाला सांगितली. यानंतर छावणी पोलीस स्टेशनला याबाबत कळविण्यात आले. यानंतर मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. हा मृतदेह हा कैलास अरुण आढाव या तरुणाचा असल्याचे त्याचा लहान भाऊ राजू आढाव याने ओळखले. कैलास हा २६ जानेवारी रोजी घरी कोणाला काही न सांगता निघून गेल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली.

फोटो : याच विहिरीत आढळला मृतदेह.

मृत कैलास अरुण आढाव

Web Title: The body of a young man was found in a paddy field