घाणेगाव-नांदेडा रस्त्यावर कामगाराचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 20:19 IST2018-10-30T20:18:50+5:302018-10-30T20:19:16+5:30
वाळूज महानगर : परिसरातील घाणेगाव-नांदेडा रस्त्यावर मंगळवारी २७ वर्षीय कामगाराचा संशयास्पद अवस्थेत मृतदेळ सापडला. भारत निवृत्ती आल्हाट (रा.विटावा) असे मृत कामगाराचे नाव असून, त्याच्या अंगावर जखमाच्या खुणा दिसून आल्याने हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घाणेगाव-नांदेडा रस्त्यावर कामगाराचा मृतदेह सापडला
वाळूज महानगर : परिसरातील घाणेगाव-नांदेडा रस्त्यावर मंगळवारी २७ वर्षीय कामगाराचा संशयास्पद अवस्थेत मृतदेळ सापडला. भारत निवृत्ती आल्हाट (रा.विटावा) असे मृत कामगाराचे नाव असून, त्याच्या अंगावर जखमाच्या खुणा दिसून आल्याने हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घाणेगावचे पोलीस पाटील शामराव फाळके यांनी घाणेगाव-नांदेडा रोडवर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मंगळवारी दिली. पोलिसांना तुकाराम गायके यांच्या गट नंबर २११ मधून जाणाऱ्या घाणेगाव-नांदेडा रस्त्याच्या बाजूला २७ वर्षीय तरुण मिळून आला.
तरुणाच्या अंगावर, हातावर व चेहºयावर जखमाच्या खुणा दिसून आल्या. त्याच्या खिशात भारत निवृत्ती आल्हाट(२७ रा.सिरेसायगाव, ह.मु.शितलनगर, विटावा) व कोमल आल्हाट या महिलेचे आधारकार्ड मिळून आले. पोलिसांनी आधारकार्डवरील संबंधित महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधत तिला घटनास्थळी बोलावले. हा व्यक्ती पती भारत आल्हाट असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. भारत याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले की, भारत आल्हाट याच्या चेहºयावर जखमाच्या खुणा आहेत. तो वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीतील कामगार असून, हा खुनाचा प्रकार असल्याची शक्यता आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर भारत आल्हाट याच्या मृत्युचे नेमके कारण समजु शकेल, असे त्यांनी सांगितले.