महिलेचा मृतदेह; पती, मुलगा बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:17 IST2017-10-31T23:17:36+5:302017-10-31T23:17:52+5:30

शेतात खुरपणीसाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून तिचा पती आणि मुलगा मात्र बेपत्ता आहेत.

Body of woman found, but husband, son missing | महिलेचा मृतदेह; पती, मुलगा बेपत्ता

महिलेचा मृतदेह; पती, मुलगा बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शेतात खुरपणीसाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून तिचा पती आणि मुलगा मात्र बेपत्ता आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. कुटुंबाने ऊसतोडीसाठी कारखान्याची उचल घेतली होती. चार दिवसांनी ऊसतोडीसाठी जाणार होते, मात्र त्याआधीच हा प्रकार घडल्याने पोलीस पेचात पडले आहेत.
तालुक्यातील सुशी येथील शेतकरी तुळशीराम लक्ष्मण पवार हे पत्नी जयश्री, मुलगा सुरेश यांच्यासोबत गावापासून जवळच माळरान शेतात ज्वारीच्या खुरपणीसाठी सोमवारी सकाळी गेले होते. मात्र उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत. त्यामुळे तुळशीरामचा भाऊ राजेंद्र आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरा शेतात शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. मंगळवारी राजेंद्र पवार यांनी गेवराई ठाण्यात तुळशीराम, जयश्री व सुरेश बेपत्ता झाल्याची माहिती दिली. दरम्यान, तुळशीरामचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शेतात आणि विहिरीच्या परिसरात पाहणी केली असता शेजारच्या शेतक-याच्या विहिरीत मुलाचे सँडल तरंगताना दिसले. त्यामुळे शोध मोहीम सुरू केली. विहिरीत दोरीच्या साह्याने गळ टाकला असता जयश्रीचा मृतदेह गळाला लागला. दुपारी २ वाजेच्या सुमारास मृतेदह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तुळशीराम यांच्या विहिरीतही शोध घेण्यात आला. दोन्ही विहिरी जवळपास १० पारस खोल असून, ७ परस पाणी असल्याने उशिरापर्यंत शोध लागला नाही.

Web Title: Body of woman found, but husband, son missing