ग्रामपंचायत सदस्याचा गोदावरी पात्रात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:03 IST2021-08-26T04:03:27+5:302021-08-26T04:03:27+5:30
बुधवारी सायंकाळी नाथमंदिरामागील मोक्षघाट परिसरातील गोदावरी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तेथील हॉटेल व्यावसायिकांनी ही माहिती ...

ग्रामपंचायत सदस्याचा गोदावरी पात्रात आढळला मृतदेह
बुधवारी सायंकाळी नाथमंदिरामागील मोक्षघाट परिसरातील गोदावरी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तेथील हॉटेल व्यावसायिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार रामकृष्ण सागडे, गोपाळ पाटील, मनोज वैद्य, मुकुंद नाईक, अरुण जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन स्थानिक युवकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून रुग्णालयात हलविला. या दरम्यान पैठण पोलिसांनी यंत्रणेमार्फत माहिती फिरविल्याने भोकरदन पोलीस ठाण्यात संबंधित वर्णनाची मिसिंग केस नोंद असल्याचे कळाले. पोलिसांनी संबंधिताच्या नातेवाईकांना कळविले. त्यांनी हा मृतदेह भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूरचे ग्रा.पं.सदस्य सुरेश नामदे यांचा असल्याचे ओळखले.
सुरेश नामदे हे १६ ऑगस्टपासून घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला; परंतु मिळून न आल्याने भोकरदन पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची खबर देण्यात आली होती. त्यांचा मृतदेह आढळल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पुढील तपास फौजदार सागडे हे करीत आहेत.