देवगाव शिवारात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:06 IST2021-05-21T04:06:04+5:302021-05-21T04:06:04+5:30
शेतकरी जाधव हे बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरातून कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडले. ते परत न आल्याने नातेवाइकांनी रात्रीपर्यंत ...

देवगाव शिवारात आढळला मृतदेह
शेतकरी जाधव हे बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरातून कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडले. ते परत न आल्याने नातेवाइकांनी रात्रीपर्यंत शोध घेतला. त्यांची दुचाकी आडगाव जावळे शिवारात सापडली. परंतु, ते दिसून आले नाही. त्यानंतर नातेवाइकांनी पाचोड पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देवगाव शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. हात बांधलेल्या व चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याने विद्रुप अवस्थेत आढळलेल्या या मृतदेहाची पाहणी पाचोड पोलिसांनी केली. याबाबत पोलिसांनी जाधव यांच्या नातेवाइकांना बोलावून मृतदेह दाखविल्यानंतर हा अशोक जाधव यांचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत.
फोटो
200521\20_2_abd_134_20052021_1.jpg
देवगाव शिवारात आढळून आलेला मृतदेह