संचालक मंडळ बरखास्त
By | Updated: December 6, 2020 04:04 IST2020-12-06T04:04:18+5:302020-12-06T04:04:18+5:30
संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी --- ग्रामीण शिक्षक पतसंस्थेचा वाद मिटता मिटेना, आरोप-प्रत्यारोप सुरूच -- औरंगाबाद ...

संचालक मंडळ बरखास्त
संचालक मंडळ बरखास्त
करून प्रशासक नेमण्याची मागणी
---
ग्रामीण शिक्षक पतसंस्थेचा वाद मिटता मिटेना, आरोप-प्रत्यारोप सुरूच
--
औरंगाबाद : औरंगाबाद तालुका जिल्हा परिषद शिक्षकांच्या पतसंस्थेतील गोंधळाची शिक्षक समन्वय समितीने अनेकदा तक्रार करून विभागीय सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषण केले. जिल्हा उपनिबंधकांनी पतसंस्थेतील अनागोंदीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे हे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांनी केली.
जिल्हा उपनिबंधकांच्या २ डिसेंबरच्या आदेशात चेअरमन, सचिव व व्हाइस चेअरमन तीनही पदांच्या निवडी करण्याचे निर्देश अध्यासी अधिकारी सचिन गुप्ता यांना दिले. त्यामुळे विद्यमान चेअरमन संतोष ताठे, सचिव व व्हाइस चेअरमन यांनीच आक्षेप घेतला आहे. तसे पत्र संस्थेने विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक व तालुका उपनिबंधक यांना दिले आहे. उपनिबंधक कार्यालय जाणीवपूर्वक संचालक मंडळाला पाठीशी घालत आहे, असा आरोप विजय साळकर यांनी केला. फक्त चेअरमन यांची निवड होणे अपेक्षित होते. बाकी सर्व बाबी चौकशी अधिकारी यांना सादर केलेल्या आहेत. कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. आम्ही दोषी असू तर होणारी शिक्षा आम्हाला मान्य असेल असे म्हणत पतसंस्थेचे चेअरमन संतोष ताठे यांनी आरोपांचे खंडन केले.