खून की आत्महत्या गूढ कायम
By Admin | Updated: October 26, 2015 00:01 IST2015-10-25T23:47:54+5:302015-10-26T00:01:29+5:30
लातूर : मुरुड-अकोला रस्त्यालगत एका पुलाजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. आज रविवारीही या मृतदेहाची ओळख पटली नाही.

खून की आत्महत्या गूढ कायम
लातूर : मुरुड-अकोला रस्त्यालगत एका पुलाजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. आज रविवारीही या मृतदेहाची ओळख पटली नाही. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही या मृतदेहाचा तपास न लागल्याने या प्रकरणातील गुढ वाढले आहे. बार्शी राज्य मार्गावरील मुरुड-अकोल रस्त्यालगत एका पुलाखालील सिमेंटच्या पाईपमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. सदर मृतदेह अंदाजे ४० वर्षीय इसमाचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू त्याच्याजवळ आढळून आलेली नाही़ त्यामुळे ही आत्महत्या की खून अशी चर्चा आहे़ पाईपमध्ये मृतदेह आढळल्याने चर्चा आहे़