रक्ताचं नातं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:11+5:302021-06-24T04:04:11+5:30

महत्त्वाचे आणि पुण्याचे दान --- गेल्या अनेक दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवतोय. लोकमत वृत्तपत्र समूह हा सामाजिक जाणीव जाणणारा वृत्तपत्र ...

Blood relationship | रक्ताचं नातं

रक्ताचं नातं

महत्त्वाचे आणि पुण्याचे दान

---

गेल्या अनेक दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवतोय. लोकमत वृत्तपत्र समूह हा सामाजिक जाणीव जाणणारा वृत्तपत्र समूह आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमीत्त लोकमत रक्ताचं नातं या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे. रक्तदान हे जीवनदानासारखेच महत्त्वाचे आणि पुण्याचे दान आहे. या दानात सर्वांनी आपला हातभार लावावा. रक्ताचा भीषण तुटवडा जाणवत असतांना मध्यंतरी अनेक शस्त्रक्रियासुद्धा पुढे ढकलण्यात आल्या. आता कोरोनाची परिस्थिती सावरते आहे. रक्तदानाबद्दलचे अनेक गैरसमजही दूर होताहेत. त्यामुळे या रक्तदानाच्या महायज्ञात जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी सहभागी होतील. रक्तदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतील. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीही या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान सर्व श्रेष्ठदान करावे. रक्तदानासाठी पुढे या.

-डाॅ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Blood relationship