एका ‘क्लिक’वर मिळणार रक्तसाठ्याची माहिती !
By Admin | Updated: December 30, 2016 00:00 IST2016-12-29T23:56:15+5:302016-12-30T00:00:05+5:30
उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेने आता कात टाकली आहे!

एका ‘क्लिक’वर मिळणार रक्तसाठ्याची माहिती !
उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेने आता कात टाकली आहे! ही ब्लड बँक थेट इंटरनेटशी जोडली गेली असून, एका क्लिकवर या ‘ई- ब्लड बँकेतील’ स्टॉकसह इतर माहिती उपलब्ध होणार आहे़ वर्षाखेरीस सुरू झालेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गरजू नागरिकांना मोठी मदत मिळणार आहे़ विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेला ई- बल्ड बँकेचे स्वरूप देण्याचा हा राज्यातील पहिला उपक्रम आहे़
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात १९८९ साली रक्तपेढी सुरू झाली़ या रक्तपेढीतून जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियांसाठी, अपघातातील जखमींसह इतर गरजू रुग्णांना रक्तचा पुरवठा करण्यात येऊ लागला़ त्यानंतर आॅगस्ट २०१३ मध्ये या रक्तपेढीत रक्त घटल विलगीकरण कें्रद्रास प्रारंभ झाला़
तर जीवन अमृत सेवेंतर्गत जानेवारी २०१४ पासून रक्ताचा पुरवठा करण्यास प्रारंभ झाला़ असले असले तरी रक्तविलगीकरण केंद्रासाठी असलेल्या तांत्रिक अडचणी, रिक्तपदे विशेषत: वेळोवेळी कमी प्रमाणात असणाऱ्या रक्ताच्या बॅगा हा प्रश्न मोठा गंभीर होत होता़ मध्यंतरीच्या काळात ब्लड बँकेतील रक्तसाठा वाढविण्यासाठी चांगले प्रयत्न झाले आहेत़
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांच्या संकल्पनेतून ‘ई- ब्लड बँक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला़ संगणकीय प्रणालीने रक्त संकलन, रक्त चाचणी, रक्तसाठा व रक्तपुरवठा या रक्तपेढीतील मुख्य कार्यप्रणालीचे याद्वारे नियोजन करण्यात आले़ या ई- ब्लड बँकेत रक्तपेढीलतील सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झाली असून, रक्तसाठ्यातील पारदर्शकता अधिक वाढली आहे़ जिल्ह्यातीलच व जिल्ह्याच्या जवळील एखाद्या नागरिकांना रक्तपेढीलतील माहिती घ्यावयाची असल्यास ती ई हॉस्पिटल डॉट गर्व्ह डॉट इन आॅब्लीक ब्लड बँक या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून शकतो़ रक्तसंक्रमण अधिकारी डॉ़ भास्कर साबळे, डॉ़ अश्विनी गोरे, टेलीमेडिसीन मधील किरण बारकूल आदी अधिकारी, कर्मचारी ही ‘ई- ब्लड बँक’ अपडेट ठेवण्यासाठी नवी दिल्ली येथील एआयसी मार्फत ही ‘ई- ब्लड बँक’ सुरू करण्यात आली आहे़
जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेतील कर्मचारी उपलब्ध माहिती, स्टॉक, प्लेटलेट, प्लाझमा, पीसीव्ही आदींची माहिती बँकेत भरत आहेत़ विशेषत: वेळोवेळी जिल्ह्यात होणारे शिबीर, शिबिरात संकिलित होणारा रक्तसाठा, रक्तदाते, त्यांचे वय, ब्लडग्रूप, मोबाईल नंबर, पत्ता आदी संपूर्ण माहिती आता या ब्लड बँकेत संकलित होणार आहे़ (प्रतिनिधी)