सम्यका गार्डनियात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:04 IST2021-04-06T04:04:02+5:302021-04-06T04:04:02+5:30
सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहेत. गरजू रुग्णांना तत्काळ रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी सम्यका ...

सम्यका गार्डनियात रक्तदान शिबिर
सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहेत. गरजू रुग्णांना तत्काळ रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी सम्यका गार्डनिया परिसरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, नरेंद्रसिंग यादव, सुनील भरते, मनोज कासलीवाल, राजेंद्र कासलीवाल आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ५१ दात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिरात डॉ.दत्ताजी भाले रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले. या प्रसंगी अंकुर बडजाते, बालाजी भराडे, आनंद चोरडिया, भरत गोरे, संदीप इंदाणेल विद्या सारडा, ज्योती भंडारी, नीता भराटे, वैशाली तोतला आदींनी रक्तदान केले.
फोटो ओळ
सम्यका गार्डनिया परिसरात आयोजित शिबिरात रक्तदान करताना दाते.
-----------------------
जनावराची निर्दयीपणे वाहतूक करणारा ट्रक पकडला
वाळूज महानगर : जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणारा मिनी ट्रक गोरक्षकाने मुंबई-नागपूर महामार्गावर पकडून एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केला. यावेळी ८ जनावरे व वाहन जप्त केले आहे.
साजापूरकडून ए.एस.क्लबच्या दिशेने शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास निटी ट्रक ( एम.एच.२०,ई.एल.१९०५) जात असताना रोहित विजयवर्गीय व अनुज धिप्पड यांना दिसून आला. त्यांनी पाठलाग करून हा मिनी ट्रक अडविला असता चालक व क्लिनर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या ट्रकची पाहणी केली असता त्यात ८ जनावरे कोंबलेली दिसून आल्याने गोरक्षकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी जनावरे व ट्रक जप्त केला आहे.
----------------------