तरूणाचा गळा आवळून खून
By Admin | Updated: August 20, 2014 01:52 IST2014-08-20T01:02:52+5:302014-08-20T01:52:51+5:30
औसा : तालुक्यातील मातोळा रोडवरील माळकोंडजी शिवारातील झुडपामध्ये एका तरूणाचा गळा आवळून डोक्यात दगडाने मारून खून करण्यात आला़ सदरील पे्रताची

तरूणाचा गळा आवळून खून
औसा : तालुक्यातील मातोळा रोडवरील माळकोंडजी शिवारातील झुडपामध्ये एका तरूणाचा गळा आवळून डोक्यात दगडाने मारून खून करण्यात आला़ सदरील पे्रताची ओळख पटू नये म्हणून जाळून टाकल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे़
या प्रेताची ओळख अद्याप पटली नसून, याप्रकरणी किल्लारी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ मंगळवारी सकाळी ९ च्या दरम्यान औसा तालुक्यातील बेलकुंड-मातोळा रोडवरील माळकोंडजी शिवारात एका २५ वर्षीय तरुणाचे प्रेत आढळले़ दरम्यान, या तरूणाचा १८ ते १९ आॅगस्टच्या मध्यरात्री खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या तरूणाचा प्रथम नायलॉनच्या दोरीने गळा आवळून डोक्यात दगड मारून निर्घृन खून करण्यात आला़ त्यानंतर रोडलगत असलेल्या झाडा-झुडपात वाळलेल्या गवतात टाकून जाळण्यात आले़ परिणामी सदरील प्रेत पूर्णपणे जळाल्याने त्याची ओळख अद्याप पटली नाही़ या ठिकाणाची पाहणी लातूरच्या श्वान पथकामार्फत करण्यात आली़ यावेळी घटनास्थळी नवीन चप्पल नायलॉनची दोरी व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़(वार्ताहर)