नाकाबंदीत तीन चोर पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: April 7, 2015 01:22 IST2015-04-07T00:43:13+5:302015-04-07T01:22:45+5:30
लातूर : नाकाबंदी करीत असताना बॅरिकेटस्ला कट मारून पळून जाणाऱ्या एका चोरास लातूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी रात्री पकडले. याबाबत लातूर ग्रामीण पोलिसात सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला.

नाकाबंदीत तीन चोर पोलिसांच्या जाळ्यात
लातूर : नाकाबंदी करीत असताना बॅरिकेटस्ला कट मारून पळून जाणाऱ्या एका चोरास लातूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी रात्री पकडले. याबाबत लातूर ग्रामीण पोलिसात सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला.
बाभळगाव नाका परिसरात लातूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी रात्री नाकाबंदी असताना एमएच २४ सी ९९४२ च्या जीप चालकाने बॅरिकेटस्ला कट मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नाकाबंदीवरील पोलिसांनी पाठलाग करून या जीपला पकडले. त्यांची झाडाझडती केली असता जीपमधील संतोष कचरू गायकवाड, कचरू गायकवाड (दोघेही रा. सिद्धेश्वर नगर), मधुकर ग्यानोबा गायकवाड (रा. विवेकानंद चौक) यांच्याकडे चोरीचे साहित्य, रोख १२ हजार ८०० रुपये, चार मोबाईल असा एकूण २ लाख १४ हजार ८०० रुपयांचा ऐवज मिळून आला. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ आलापूरकर यांच्या फिर्यादीवरून कलम २७९, २८३, ४०१ भादंवि, १८४, ३ (१)/ १८४ एमव्ही अॅक्टनुसार गुन्हा नोंद आहे.