बोगस तुकड्या वाटप प्रकरणी१८ अधिकारी कर्मचाऱ्यांवर ठपका
By Admin | Updated: July 29, 2015 00:49 IST2015-07-29T00:42:42+5:302015-07-29T00:49:15+5:30
लातूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी स्वस्थता!वाटप २६२ उर्दू शाळेच्या बंद पडलेल्या बोगस तुकड्या वाटप

बोगस तुकड्या वाटप प्रकरणी१८ अधिकारी कर्मचाऱ्यांवर ठपका
लातूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी स्वस्थता!वाटप २६२ उर्दू
शाळेच्या बंद पडलेल्या बोगस तुकड्या वाटप करण्यात आल्या होत्या़ या प्रकरणी न्यायालयाने १८ अधिकारी कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला आहे़ त्यामुळे शिक्षण विभागात मंगळवारी अस्वस्थता होती़
बोगस तुकड्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल भोसले यांनी मागील चार वर्षांपासून न्यायालयीन लढा दिला़ त्या प्रकरणाची न्यायालयाने सुनावणी झाली असून त्यासंबंधी १८ अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ठपका ठेवला आहे़ या अधिकाऱ्यांची एक वर्षाच्या आत खातेनिहाय चौकशी पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आहेत़ मागील चार वर्षांपासून २६२ बोगस तुकडी वाटप प्रकरण गाजत आहे़ २००६ ते २०१२ या कालावधीत बंद पडलेल्या उर्दू शाळेतील तुकड्या तसेच मोठ्या विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेंची पटसंख्याही अधिक दाखविली होती़ नियमबाह्य पद्धतीने तुकड्यांचे वाटप व पटसंख्या दाखविण्यात आली होती़ दरम्यान, या प्रकरणी शिशिर घोनमोडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली़ या समितीच्या चौकशीत केवळ २४३ तुकड्या निदर्शनास आल्या़ अन्य १९ तुकड्यांचा शोध लागला नाही़ ज्या शाळांना या तुकड्या वाटप केल्या, त्या शाळा चौकशी समिती समोर आल्याच नाहीत़ त्यामुळे अद्यापही १९ तुकड्या कागदोपत्रीच आहेत़ प्रशासनाने यापूर्वीच बोगस तुकड्यांबाबत कारवाई केली आहे़ आता न्यायालयानेही १८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला आहे़ त्यामुळे शिक्षण विभागात अस्वस्थता आहे़ (प्रतिनिधी)