शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
2
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
3
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
4
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
5
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
6
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
7
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
8
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
9
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
10
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
11
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
12
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
13
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
14
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
15
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
17
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
18
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
19
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
20
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप

फुलंब्री नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 16:02 IST

नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ नगरसेवक व नगराध्यक्ष पद भाजपने काबीज केली. भाजपच्या सुहास सिरसाठ यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांचा १९० मतांनी  पराभव केला. शहर विकास आघाडीचे केवळ पाच नगर सेवक निवडून  आले तर एमआयएमचा १ नगरसेवक निवडून आला.

ठळक मुद्देनगराध्यक्ष सुहास सिरसाठ १९० मतांनी विजयी१७ पैकी ११ नगरसेवक हि विजयी 

फुलंब्री (औरंगाबाद ) : नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ नगरसेवक व नगराध्यक्ष पद भाजपने काबीज केली. भाजपच्या सुहास सिरसाठ यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांचा १९० मतांनी  पराभव केला. शहर विकास आघाडीचे केवळ पाच नगर सेवक निवडून  आले तर एमआयएमचा १ नगरसेवक निवडून आला.

नगर पंचायतसाठी बुधवारी मतदान झाले होते. आज याची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात करण्यात आली. पहिल्या १५ मिनिटामध्येच नगरसेवक पदाचे निकाल हाती आली. तर नगराध्यक्ष पदाचा निकाल सर्वात शेवटी जाहीर करण्यात आला. १७ पैकी ११ जागा व नगराध्यक्ष पदी निर्विवाद वर्चस्व गाजवत भाजपने शहर विकास आगःडीला शह दिला. संपूर्ण निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरभर जोरदार जल्लौश केला. 

शहर विकास आघाडीला धक्का भाजपच्या विरोधात तीन पक्षांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन केली होती. यामुळेच हा पराभव शहर विकास आघाडीचे प्रमुख माजी आमदार डॉ कल्याण काळे यांना मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदार संघातील नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आल्याने याचा फायदा येणाऱ्या काळात भाजपला नक्कीच होईल. 

विजयी नगरसेवक व त्यांना मिळालेली मते 

भाजपा -एकनाथ महादू ढोके [ ३४० ],द्वारका संतोष जाधव [ ३४८ ],शामबाई किसन गुंजाळ-[२५५ ],अश्विनी वाल्मिक जाधव -[ २१५ ],इंदुबाई मधुकर मिसाळ -[३८२ ],वैशाली बाबासाहेब सिनगारे -[ ३६९ ],गणेश कृष्णा राउत -[३८२ ],रत्ना वालुबा सोनवणे -[ ४०५ ],अजय वामनराव शेरकर -[ ४७० ],शेख अकबर जणू पटेल-[ ३९१ ],गजानन दतात्रय नागरे-[ ३४३ ]

शहर विकास आघाडी मुद्दसर अजगर पटेल -[ ३५६ ],सुमया अलीम मन्सुरी -[४९८ ],गयाबाई रुपचंद प्रधान -[ २९५ ],अब्दुल राउफ मजीद कुरेशी -[३५२ ] ,मोहिनी संदीप काथार ,तर एमयएम कडून =-सय्यद जफरोदिन आफजलोदिन -[ ३१० ] हे निवडून आले आहे 

एमआयएमचा प्रवेश फुलंब्री नगर पंचायत मध्ये एमआयएम या पक्षाने प्रवेश केला असून त्यांचा एक नगरसेवक निवडून आला. शेवटच्या दिवशी त्याने एमयएम कडून उमेदवारी आर्ज दाखल केला होता त्याला मतदारांनी स्वीकारले. 

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद