भाजपाचा बैलगाडी मोर्चा
By Admin | Updated: August 14, 2014 01:57 IST2014-08-14T01:37:21+5:302014-08-14T01:57:19+5:30
लातूर : लातूर, रेणापूर व औसा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हा

भाजपाचा बैलगाडी मोर्चा
लातूर : लातूर, रेणापूर व औसा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हा कचेरीवर बैैलगाडी मोर्चा काढण्यात आला़ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे व रमेश कराड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले़ सकाळी ११ वाजता गंजगोलाईतून हा मोर्चा निघाला़ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला़
जनावराच्या चारा छावण्या उभ्या करा, शेतकऱ्यांचे कर्ज व विजबील माफ करावे, शेतकऱ्यांना पीक विमा लागू करा, ठिबक सिंचन योजनेतून शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान तात्काळ द्यावे, खरीप पीकापोटी हेक्टरी पन्नास हजार रूपये अनुदान द्यावे, महाविद्यालय व शालेय विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी, त्यांना शिष्यवृती द्यावी व शैक्षणिक शुल्क माफ करावे, मजुरांच्या हाताला काम द्यावे, टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, महिला बचत गटाचे कर्ज माफ करावे, दारिद्रय रेषेखालील यादीचे पुनर्सर्व्हेक्षण करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़
मोर्चात आमदार सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी खा़ डॉ गोपाळराव पाटील, अहमदपूरचे दिलीपराव देशमुख, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, राज्य सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, संभाजीराव पाटील निलंगेकर, सुरेश लहाने, ओमप्रकाश गोडभरले, जिल्हा सरचिटणीस नवनाथ भोसले, पन्नगेश्वरचे चेअरमन किशन भंडारे, तालुकाध्यक्ष हणमंत नागटिळक, रेणापूर तालुकाध्यक्ष श्रीकिशन जाधव, पंचायत समिती सदस्य पद्माकर चिंचोलकर, प्रदीप कुलकर्णी, सतिष अंबेकर, रामराव मोरे, मंजुषा कुटवाड, सुरेखा पुरी, बालाजी दुटाळ, गजेंद्र चव्हाण, राजकिरण साठे, रशिद पठाण, बाबासाब शेख, मल्हारी सिरसाठ, तानाजी ढोबळे, पांडुरंग गडदे, काकासाहेब भोसले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)