विधानसभेतील परतफेडीसाठी भाजपची आघाडीला साथ
By Admin | Updated: November 4, 2016 00:13 IST2016-11-04T00:11:44+5:302016-11-04T00:13:29+5:30
बीड : माजलगाव नगरपालिकेमध्ये भाजपने सहाल चाऊस यांना मदतीचा हात दिला आहे.

विधानसभेतील परतफेडीसाठी भाजपची आघाडीला साथ
बीड : माजलगाव नगरपालिकेमध्ये भाजपने आपला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार न देता विधानसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत केलेल्या सहाल चाऊस यांना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून मदतीचा हात दिला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाल चाऊस हे न. प. निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
माजलगाव नगर पालिका निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येत आहे. माजलगावमध्ये भाजपला उमेदवार मिळाला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असली तरी खरी वस्तुस्थिती वेगळी आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सहाल चाऊस यांनी उघडपणे भाजपचे आमदार आर. टी. देशमुख यांचा प्रचार केला. याची आठवण म्हणून भाजपने माजलगाव नगरपालिकेत आघाडी केलेल्या सहाल चाऊस यांना मदतीचा हात दिले आहे. केवळ १० उमेदवारांनाच एबी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या घडामोडीमुळे माजलगावचे राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहेत. आघाडीमुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. शिवसेनेबरोबरची युती तोडत भाजपने हा धाडसी निर्णय घेतला आहे.
एकंदरीत या साऱ्या पडझडीला राकाँचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा नितीन नाईकनवरे या कशा सामोरे जातात हे पाहण्यासाठी वेळ जावा लागणार आहे.
यातच राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेल्या शेख मंजूर यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारकत घेऊन मोहन जगताप हे देखील आघाडीच्या सोबत असल्याचे चित्र माजलगावमध्ये आहे. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर राजकीय समीकरणे बदलली आहेत. (प्रतिनिधी)