शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

महापालिका निवडणुकीत भाजपचीही स्वबळाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:17 IST

पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ही भूमिका पोहोचविण्यात आल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

- विकास राऊत 

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांना साडेचार महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्या निवडणुकींच्या राजकीय नियोजनावर राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षाची ठिणगी पडली आहे. राज्यातील सत्ता समीकरणात शिवसेना-भाजप महायुतीचे सूर जुळो अथवा न जुळो, पालिका निवडणुका युती करून न लढण्याची भूमिका भाजप पदाधिकारी, इच्छुकांनी घेतली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ही भूमिका पोहोचविण्यात आल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले तर मनपा निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे लढतील, असे शिवसेनेने सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपने देखील स्वबळाच्या अनुषंगाने पूर्ण वॉर्डनिहाय सामाजिक आरक्षणांच्या हेतूसह उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम सध्या सुरू आहे. प्रभाग रचनेत सोयीनुसार वॉर्डांच्या सीमांची हद्द आखण्यासाठी शिवसेना आणि भाजपतील इच्छुक पालिका निवडणूक विभागावर लक्ष ठेवून आहेत. 

सत्ताधारी असोत किंवा विरोधक प्रभाग रचनेच्या कामांत फारशी लुडबुड करणे शक्य नसते, तरीही सेना, भाजपतील इच्छुकांनी सर्व मार्गांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान बुधवारी पक्षाची मुंबईत संघटन कार्यशाळा होणार आहे. त्या कार्यशाळेत राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे, याबाबत चिंतन होणार आहे. दरम्यान रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत भाजपतील पदाधिकाऱ्यांनी पालिकेत स्वबळावर लढल्यास काय स्थिती असेल, याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पूर्व मतदारसंघातही आ. अतुल सावे यांनीही प्रभाग रचनेप्रकरणी आढावा घेतल्याची चर्चा आहे. 

हिंदुत्व हा आता आमचा मुद्दा भाजप महापालिका स्वबळावर लढणार आहे. हिंदुत्व आणि विकास हा आमचा मुद्दा राहील. शिवसेनेचा हिंदुत्व हा मुद्दा आहे की नाही, हे माहिती नाही. हिंदुत्वाच्या मुद्यासह शहरातील विकासकामांची आमची भूमिका काल होती, आजही आहे आणि येणाऱ्या काळातही राहणार आहे. मागील पाच वर्षांत भाजपने शहरातील रस्ते कामांसाह पाणीपुरवठा योजनेला निधी मंजूर करून आणला. हे सर्व कुणी केले, हे जनतेला माहिती आहे. - डॉ. भागवत कराड, अध्यक्ष, मराठवाडा विकास मंडळ

आमचीही स्वबळाची तयारी शिवसेना काय करणार, हे माहिती नाही. सेना-भाजप युती मागील अनेक वर्षांपासून पालिकेत सोबत आहे; परंतु आता शिवसेनेची मानसिकता बदलली असेल तर भाजपची स्वबळाची तयारी कालही होती, आजही आणि उद्यादेखील राहील. अजून मनपा निवडणुकीला वेळ आहे. साडेचार महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत राज्यात काहीही होऊ शकते. -शिरीष बोराळकर, प्रवक्ते, भाजपा 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना