शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:00 IST

‘भाजप महापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही’ मथळ्याखाली ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मनसुब्यावर अक्षरश: पाणी फेरले गेले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांची भेट घेतली. त्यांनी महापौर निवडणुकीनिमित्त अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘भाजप महापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही’ मथळ्याखाली ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मनसुब्यावर अक्षरश: पाणी फेरले गेले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांची भेट घेतली. त्यांनी महापौर निवडणुकीनिमित्त अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवडणूक घेण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेना-भाजप युतीमधील करारानुसार यंदा महापौरपद अडीच वर्षांसाठी सेनेकडे आहे. शिवसेनेने निवडणुकीच्या एक महिना अगोदरच महापौरपदाचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांच्या नावाची घोषणा केली. मागील काही दिवसांपासून भाजपमधील काही इच्छुक नगरसेवक युती तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. युती तुटत नसल्याने इच्छुकांनी भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याचे प्रचार सुरू केला होता. भाजपच्या या प्रचारतंत्राला ब्रेक लावण्याचे कामही सेनेने केले. सेनेने युतीधर्म पाळत महापौरपदाचा उमेदवार घोषित केला. उपमहापौरपदासाठी घोषणा केली नाही. उपमहापौरपदी कोणाची वर्णी लावावी याचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवून देण्यात आला. त्यातच ‘लोकमत’ने विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप युतीधर्म पाळणार असल्याचे वृत्त शनिवारी प्रकाशित केले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. महापौर निवडणुकीसाठी आकड्यांचे गणित मोडत बसणाºयांची कोंडी झाली.शनिवारी सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर शहरात दाखल झाले. त्यांनी भाजपचे स्थानिक नेते माजी महापौर भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रवक्ते शिरीष बोराळकर यांची भेट घेतली. घोसाळकर यांच्यासोबत राजू वैद्य, घोडेले आदींची उपस्थिती होती. भाजप नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच घोसाळकर हे रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे यांचीही भेट घेणार आहेत.