शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का; बीडचे सहा जि.प. सदस्य मतदानासाठी अपात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 13:32 IST

बीड जिल्हा परिषदेतील सहा सदस्यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देणारा ग्रामविकासमंत्र्यांचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा यांनी शुक्रवारी (दि.४ मे)  रद्द ठरविला.

ठळक मुद्देया सदस्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून बैठकीला उपस्थित राहता परंतु मतदानात भाग घेता येणार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

औरंगाबाद : बीड जिल्हा परिषदेतील सहा सदस्यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देणारा ग्रामविकासमंत्र्यांचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा यांनी शुक्रवारी (दि.४ मे)  रद्द ठरविला.  सदर प्रकरण फेरसुनावणीकरिता पुन्हा मंत्र्यांकडे वर्ग के ले. याप्रकरणी १५ मे रोजी सुनावणी घेऊन फेरनिर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. दरम्यान, या सदस्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून बैठकीला उपस्थित राहता येईल; परंतु मतदानात भाग घेता येणार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

यासंदर्भात जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बजरंग सोनवणे, मंगला प्रकाश सोळंके आणि अजय मुंडे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  सदस्य शिवाजी पवार, प्रकाश कवठेकर, अश्विनी जरांगे, संगीता महानोर, मंगला डोईफोडे आणि अश्विनी निंबाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये सहभाग होता. त्यांच्या गटाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यताही दिलेली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीकरिता आघाडीचे गटनेते बजरंग सोनवणे यांनी २५ मार्च २०१७ ला व्हिप जारी केला होता. मात्र हा व्हिप डावलून पाच जणांनी मतदान केले तर मंगला डोईफोडे या गैरहजर राहिल्या. व्हिप डावलल्याने या सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात गटनेते सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. यावर सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी एम.डी.सिंग यांनी १६ आॅक्टोबर २०१७ रोजी या सहा सदस्यांना अपात्र ठरविले.

या निर्णयाविरोधात सहाही सदस्यांनी ग्रामविकासमंत्र्यांकडे अपील दाखल केले. याचिकाकर्त्यांच्या वतीनेही कॅव्हेट दाखल करण्यात आले. परंतु यावर कोणतीही सुनावणी न घेता अपिलाच्या निकालापर्यंत या अपात्रतेला मंत्र्यांनी अंतरिम स्थगिती दिली.त्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीअंती खंडपीठाने कोणतीही सुनावणी न घेता, नैसर्गिक न्यायतत्त्वाचा भंग झाल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करून मंत्र्यांचा आदेश रद्द केला आणि वरीलप्रमाणे आदेश दिला. याप्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. एन. एल. जाधव यांच्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञ  एस. व्ही. कानिटकर, प्रतिवादींतर्फे अ‍ॅड. व्ही. डी. साळुंके, अ‍ॅड. गिरीश थिगळे (नाईक), अ‍ॅड. व्ही. एम. चाटे व अ‍ॅड. बी. एन. पाटील, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. 

मतदान करता येणार नाही १५ मे रोजी सुनावणी घेऊन फेरनिर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून बैठकीला उपस्थित राहता येईल; परंतु मतदान करता येणार नाही.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSuresh Dhasसुरेश धसAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस