शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

भाजपकडून अध्यक्षांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:00 IST

विकास निधी वाटपामध्ये पक्षपाती भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना तब्बल तासभर भाजप सदस्यांनी कोंडीत पकडले.

ठळक मुद्देऔरंगाबाद जि. प. सर्वसाधारण सभा : विकास निधीपासून वंचित ठेवल्याप्रकरणी सभागृहात गदारोळ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विकास निधी वाटपामध्ये पक्षपाती भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना तब्बल तासभर भाजप सदस्यांनी कोंडीत पकडले. अखेर बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी विकास निधीपासून वंचित राहिलेल्या सदस्यांना आठवडाभरातच प्रत्येकी १५ लाखांच्या कामांची प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन देत संतप्त भाजप सदस्यांची मनधरणी केली.शिवसेनेच्या देवयानी पाटील डोणगावकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. जिल्हा परिषदेत भाजपची सदस्य संख्या सर्वाधिक असतानाही सेना व काँग्रेसने आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. हे शल्य भाजप सदस्यांमध्ये आहे. दुसरीकडे, जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हांतर्गत रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी प्राप्त निधीमध्ये भाजपच्या काही सदस्यांना डावलण्यात आले. या मुद्यावर आजपर्यंत सलग तीन सर्वसाधारण सभांमध्ये भाजप सदस्यांकडून अध्यक्षांची कोंडी केली जाते. मागील सभेत भाजप सदस्य एल.जी. गायकवाड यांना एक दिवसासाठी निलंबितही करण्यात आले होते. मधुकर वालतुरे यांनी याच मुद्यावर अध्यक्षांच्या दालनासमोर उपोषणही केले होते. त्यावेळी आठ दिवसांत वंचित सदस्यांना निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही. याचा वचपा काढण्यासाठी भाजप सदस्यांनी सर्वसाधारण सभेला सुरुवात होण्यापूर्वीच अध्यक्षांना घेरण्याची व्यूहरचना आखली होती.दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होताच सभेची नोटीस मिळाली नाही, या मुद्यावर सभागृहाला धारेवर धरण्यात आले. त्यानंतर लगेच भाजपचे गटनेते शिवाजी पाथ्रीकर यांनी वंचित सदस्यांना न्याय देणार आहात का, प्रत्येक सभेत आम्ही याच मुद्यावर भांडायचे, तुम्ही प्रत्येक वेळा केवळ आश्वासनेच द्यायची, हे थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला. काही मर्जीतल्या सदस्यांना ४ कोटी रुपयांपर्यंत विकास निधी दिला आणि काही सदस्यांना एक छदामही दिलेला नाही. बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्यावरील रोष व्यक्त करताना शिवाजी पाथ्रीकर हे पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाव आता वैयक्तिक बांधकाम विभाग आणि या विभागाचे सभापतींचे वैयक्तिक बांधकाम सभापती असे केले, तर ते वावगे ठरणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पहिलीच सभासभागृहात तास-दीड तास सुरू असलेले रणकंदन पाहून नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर या अवाक् झाल्या. सदस्य आक्रमकपणे विचारत असलेले प्रश्न आणि बारीक-सारीक मुद्यांवर सभागृहाची केली जाणारी कोंडी हा प्र्रकार पवनीत कौर यांच्यासाठी नवीनच होता. पवनीत कौर यांची आजची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती.संपूर्ण सभेत त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. भाजप सदस्या रेखा नांदूरकर यांनी ‘आम्हाला न्याय द्या’ असे म्हणत अर्धा तास खुर्चीवर उभ्या राहिल्या. जि.प. सदस्य सुरेश सोनवणे, सुरेश गुजराने, ज्योती चोरडिया, पुष्पा काळे, एल.जी. गायकवाड, मधुकर वालतुरे, प्रकाश चांगुलपाये आदी भाजप सदस्यांनी सभागृहाला धारेवर धरले.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदBJPभाजपाfundsनिधी