शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

भाजपा माझ्या बापाचा पक्ष, हा अहंकार नसून प्रेम - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 17:35 IST

राजकीय भूकंप झाल्याप्रमाणे एकामागून एक अनेकांचे फोन आले

ठळक मुद्देशिरीष तुझ्यासाठी एक जणाचे तिकिट कापून आले

औरंगाबाद : अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे. हा अहंकार नसून प्रेम आहे. उंटावरून कुणीही शेळ्या हाकायच्या नाही. कुणाला निमंत्रण मिळाले, म्हणून नाराज व्हायचे नाही. काल रात्री आठ वाजता डॉ.कराड, नंतर आ.निलंगेकर मग बोराळकर यांचा फोन आला, औरंगाबादेत राजकीय भूकंप झाल्याप्रमाणे सगळ्यांचे एकामागून एक फोन आले. सगळ्यांचे एकच सांगणे एकच होते, आमचा फॉर्म भरण्याची वेळ ठरली आहे. विमानात तिकिट नव्हते, परंतु आज आले नसते तर मी नाराज असल्याची हेडलाईन झाली असती. भाजपा, मुंडे साहेबांनी जे संस्कार केले आहेत, त्यानुसारच पक्ष जो उमेदवार देईल, त्याचे काम करणे कर्तव्य असल्याचे सांगून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उमेदवारीवरून नाराजी आणि गटबाजीवर गुरूवारी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी गुरूवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या सेव्हन हिल्स येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी खा.डॉ.भागवत कराड, खा.प्रीतम मुंडे, आ.हरिभाऊ बागडे, सचिव विजया रहाटकर, निवडणुकप्रमुख आ. संभाजी निलंगेकर, आ.अतुल सावे, आ.मेघना बोर्डीकर, आ.रमेश कराड, आ.तानाजी मुटकूळे, आ.राजेश पवार, आ.सुरेश धस, आ.अभिमन्यू पवार, संजय केणेकर आदींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी मुंडे म्हणाल्या, मी आलेली आहे, खुप कष्टाने वेगैरे नाही, सातसमुद्र पार करून आलेले नाही. आज विमानात जागा नव्हती, पुर्ण बुक होते. मग बोराळकरसाठी  एकजणाचे तिकिट कापले आणि आले. यापेक्षा काय संदेश द्यायचा आहे. आता जास्तीचे सांगायची गरज नाही, बंडखोरी झाली आहे, ती फक्त चर्चा आहे. कुणाचे नाव घेतले नाही म्हणून आता माझ्यावर रागावू नका, जे काही रागवयाचे असेल ते उमेदवारावर रागवा. असे सुचक वक्तव्य करून त्यांनी मनातील सल बोलून दाखविली. दरम्यान भाजपाचे बंडखोर प्रवीण घुगे, रमेश पोफळे, माजी खा.जयसिंगराव गायकवाड यांची कार्यक्रमाला उपस्थिती नव्हती. 

नाराजांची समजुत काढणारपुर्वी गोपीनाथ मुंडे उमेदवार निश्चित करायचे आता त्यांच्या कन्येला वगळून उमेदवार दिले जात आहेत. तुम्ही नाराज आहेत काय ? मी नाराज नाही. ज्यांनी अर्ज भरला आहे ते माघार घेतील, त्यावर मुंडे म्हणाल्या, माझे समर्थक म्हणून नाहीतर ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. नाराज असण्याचे कारण नाही. बोराळकर यांना मागेही उमेदवारी दिली होती. गेल्यावेळी मुंडे यांच्या मृत्यूमुळे कार्यकर्त्यांत उदासिनता होती. कोअर कमिटीच्या विविध नावांवर चर्चा झाली. सामाजिक संतुलनानुसार पाहून उमेदवारी दिली. माझे समर्थक जे आहेत, ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. बोराळकरांना विरोध, घुगेंना पाठींबा असे नाही. त्यांची समजुत घालील. पोफळे यांना भेटेल. त्यामध्ये मला यश येईल असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद