शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

By admin | Updated: August 1, 2014 01:05 IST

बीड : जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामात कोट्यवधी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप करीत गुरुवारी भाजपचे सदस्य जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना भेटले़

बीड : जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामात कोट्यवधी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप करीत गुरुवारी भाजपचे सदस्य जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना भेटले़तेरावा वित्त आयोग, झेडपीआर या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप सदस्यांनी केला़ रस्ते, नाल्या, बंधारे यांची बोगस कामे केल्याची कैफियतही सदस्यांनी मांडली़ याशिवाय सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त ९ महिने उलटले तरीही दिले गेले नाही़ अधिकारी आणि सत्ताधारी यांच्यात संगनमत असून कोणाचाच कोणाला पायपोस राहिला नाही, असा आरोप भाजपचे गटनेते मदनराव चव्हाण यांनी केला़ तेराव्या वित्त आयोगातून किती कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या, याची कोठलीच नोंद जि़ प़ मध्ये नाही़ त्यामुळे सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ जि़ प़ सदस्य दशरथ वनवे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, प्रदेश सदस्य कल्याण आखाडे, सुभाष धस, सुरेश उगलमुगले, भगीरथ बियाणी, सर्जेराव तांदळे, शेख फारुक उपस्थित होते़ याबाबत अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्याशी संपर्क झाला नाही़ उपाध्यक्षा अर्चना रमेश आडसकर म्हणाल्या, प्रशासकीय मान्यता सीईओंना त्यांच्या अधिकारात दिलेल्या आहेत़ अनियमितता झाली असे म्हणता येणार नाही़ सर्व सदस्यांना झेडपीआरमधून कामे मिळालेली आहेत़ प्रोसेडिंग द्यायला हवे होते हे खरे आहे़ (प्रतिनिधी)