छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. भाजपने महापौरपदासाठी समीर राजूरकर यांचे नाव निश्चित केल्यानंतर, महायुतीतर्फे उपमहापौर पदासाठी शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, या निर्णयामुळे शिंदेसेनेत उघडपणे दोन गट पडले असून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिरसाट विरुद्ध जंजाळगटबाजी उफाळली मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेच्या १३ नगरसेवकांमध्ये आता ९ विरुद्ध ४ अशी विभागणी झाली आहे. जंजाळ यांच्या निवडीला शिरसाट गटाने कडाडून विरोध केला असून, पालकमंत्र्यांच्या गटाकडून तीन उमेदवारी अर्ज घेतल्याची चर्चा शहरात रंगली आहे. यामुळे एकीकडे भाजप सत्तेचा जल्लोष करण्याच्या तयारीत असताना, मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेत मात्र 'नाराजीनाट्य' रंगात आले आहे.
मंत्री अतुल सावे यांची सारवासारव या वादावर पडदा टाकण्यासाठी भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकमताने महापौर आणि उपमहापौर बसवू. शहराच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. कोणतीही नाराजी असेल तर उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः त्यांच्याशी चर्चा करतील."
गटनेतेपदाचा पेच कायम मनपा निवडणुका होऊन २० दिवस उलटले तरी शिंदेसेनेला आपला गटनेता ठरवता आलेला नाही. त्यातच आता उपमहापौर पदावरून निर्माण झालेला हा पेच सोडवण्याचे मोठे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे. भाजपने ५७ जागांच्या बळावर समीर राजूरकर यांच्या रूपाने आपला दावा भक्कम केला असला तरी, उपमहापौर पदाच्या निवडीवेळी शिंदेसेनेची ही अंतर्गत गटबाजी महायुतीला महागात पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Sambhaji Nagar's mayoral race sees BJP's Rajurkar confirmed. Shinde Sena faces infighting over the Deputy Mayor post, creating tension within the coalition, despite assurances of unity.
Web Summary : संभाजीनगर में बीजेपी के राजूरकर का मेयर बनना तय है। उपमुख्यमंत्री पद को लेकर शिंदे सेना में अंदरूनी कलह है, जिससे गठबंधन में तनाव है, हालांकि एकता का आश्वासन दिया गया है।