भाजपच्या नेत्यांनी घेतली वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी
By | Updated: November 29, 2020 04:07 IST2020-11-29T04:07:45+5:302020-11-29T04:07:45+5:30
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. जालना जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी ...

भाजपच्या नेत्यांनी घेतली वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. जालना जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतली. तसेच औरंगाबादची खा. डॉ. भागवत कराड, बीड, लातूर, परभणी जिल्ह्यातील जबाबदारी राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी स्वीकारली. उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील जबाबदारी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वीकारली आहे. तसेच ते मराठवाडा पदवीधर निवडणूक सहप्रमुख म्हणून काम करीत आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री मतदारसंघासह सहकारी बँक, दूध महासंघ, साखर कारखाने यांच्या संपर्कात आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेतेदेखील वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या संभाळत आहेत. यात खा. डॉ. कराड हे शिक्षण संस्था, हाॅस्पिटल, डॉक्टर यांच्या भेटी घेत आहेत. आ. अतुल सावे यांच्या कडे पूर्व मतदारसंघासह औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मतदारांसोबत संवाद साधत आहेत. राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर या शासकीय कार्यालय, सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी सांभाळत आहेत. लोकसभा व विधानसभानिहाय प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारी स्वीकारली आहे. यात प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख संजय केणेकर, पूर्वचे प्रमुख प्रमोद राठोड, मध्येचे प्रमुख समीर राजूरकर, पश्चिमचे प्रमुख दिलीप थोरात, फुलंब्रीचे प्रमुख बापू घडामोडे आदी काम पाहत आहेत.
चौकट,
राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रचारात
महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, आ. नितेश राणे, आ. श्रीकांत भारतीया आदींनी मराठवाड्यात ठांण मांडत प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.