काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाला मोठी आघाडी

By Admin | Updated: May 21, 2014 00:16 IST2014-05-20T23:58:33+5:302014-05-21T00:16:07+5:30

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर उदगीर तालुक्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठी आघाडी मिळाली आहे.

The BJP has a big lead in the citadel of the Congress | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाला मोठी आघाडी

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाला मोठी आघाडी

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर उदगीर तालुक्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठी आघाडी मिळाली आहे. उदगीर पालिकेत ३३ पैकी २६ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवाय, पंचायत समितीमध्ये १२ पैकी १० सदस्य काँग्रेसचे आहेत. जि.प.चे ६ पैकी ५ सदस्य काँग्रेसचेच असताना व उदगीरचे जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाची बाजार समितीही काँग्रेसच्याच ताब्यात असताना भाजपाला तब्बल ४७ हजारांची आघाडी मिळाली आहे. उदगीर शहरात तीन काँग्रेसचे मातब्बर नेते असताना शहरात भाजपाला ४९३३ ची लिड मिळाली आहे. हाळी येथे भाजपाला १४६ मतांची लिड मिळाली आहे. तर बोरताळा तांड्यावर काँग्रेसला ११ मते अधिक मिळाली आहेत. तोगरी येथे भाजपाला ४८३ मतांची आघाडी मिळाली आहे. डिग्रस येथे भाजपाला ४२ मतांची तरर दावणगाव येथे भाजपाला ५८७ मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपाचे जि.प. सदस्य असलेल्या रामचंद्र तिरुके यांच्या सताळा (खु.) गावात भाजपाला ३४८ मते अधिक मिळाली आहेत. हंडरगुळी गावात ९०० मतांची, हेर गावात ९९१ मतांची, वाढवणा (बु.) गावात ४०१ मतांची, तोंडार गावात ९४७ मतांची, देवर्जन व हाणमंतवाडी गावात १२७९ मतांची, लिंबगाव गावात ६७ मतांची, शेल्हाळ गावात ७७० मतांची, बेलसकरगा गावात ४४१ मतांची, बनशेळकी गावात ४१५ मतांची, लोहारा गावात १०६१ मतांची भाजपाला आघाडी मिळाली आहे. भाजपाच्या पं़स़ सदस्य असलेल्या केरुबाई केंद्रे यांच्या देऊळवाडी गावात ४३९ मतांची तर डोंगरशेळकी येथील भाजपा सदस्य केरबा सूर्यवंशी यांच्या गावात ६५९ मतांची आघाडी भाजपाला मिळालेली आहे. जळकोट गावात भाजपाला ४०१ मतांची तर माजी आ. गोविंदराव केंद्रे यांच्या कुमठा (खु.) गावात भाजपाला ८७६ मतांची आघाडी मिळाली आहे. नळगीर येथे ५२७ मतांची तर गव्हाण येथे १९३ मतांची आघाडी भाजपाला मिळालेली आहे. शिवाजीनगर तांडा येथे १४७ मतांची आघाडी काँग्रेसला मिळाली आहे. येणकी गावात ४७३ मतांची आघाडी भाजपाला मिळाली आहे. उदगीर शहरात काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांना १४७२२ मते मिळाली, तर भाजपा उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांना १९६५५ मते मिळाली आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालेल्या जायभायचीवाडी गावात काँग्रेसचे उमेदवार बनसोडे यांना केवळ ३ मते मिळाली, तर भाजपा उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांना ३३२ मते मिळाली आहेत. उदगीर मतदारसंघात भाजपाचे विजयी उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांना १०००४५ मते मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांना ५३२४७ मते मिळाली. बसपा उमेदवार दीपक कांबळे यांना २४०० मते मिळून ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले. तर २१६१ जणांनी ‘नोटा’चे बटन दाबून नकारार्थी मतदानाचा हक्क बजावला. तर एकूण १६४७१२ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता.

Web Title: The BJP has a big lead in the citadel of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.