शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपचाच 'धुरंधर'; शिंदेसेनेची जिल्ह्यात मोठी पीछेहाट

By विकास राऊत | Updated: March 19, 2026 14:48 IST

एक खासदार, अर्धा डझन आमदार असतानाही शिंदेसेनेची पीछेहाट; खासदार, अर्धा डझन आमदार असूनही शिंदेसेनेला जिल्हा परिषदेत भाजपचा 'चेकमेट'

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेची युती तुटल्यानंतर भाजपने ५७ जागा जिंकत विक्रम केला. त्यानंतर नऊपैकी सहा पंचायत समित्या व बुधवारी जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकाविला. ‘धुरंधर’ राजकारण करीत भाजपने शिंदेसेनेला शह दिला असून, याचे पडसाद आगामी काळात कसे उमटतील, याकडे लक्ष लागले आहे. शिंदेसेना-भाजपच्या युतीमध्ये बुधवारी मिठाचा खडा पडला असून, आगामी काळात याचे पडसाद मनपा आणि जि. प.सह इतर स्थानिक संस्थांच्या राजकारणात उमटतील.

जि. प., पं. स. निवडणुकीत युती कागदावर असतानाही प्रत्यक्षात भाजप-शिंदेसेना उमेदवार काही गट-गणांत एकमेकांच्या विरोधात लढल्याने कुणालाही बहुमत मिळाले नाही. जि. प. अध्यक्षपदासाठी ३२ हा बहुमताचा जादुई आकडा गाठणे भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार)ला एकमेकांच्या सोबतीविना अशक्य होते. परंतु, यात शिंदेसेनेला पहिल्या अडीच वर्षांत अध्यक्षपद हवे होते. त्यामुळे भाजपने पूर्ण ताकदीने गोळाबेरीज करीत जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपद ताब्यात घेतले. एक खासदार, अर्धा डझन आमदार असतानाही शिंदेसेनेची जिल्ह्यात पीछेहाट सुरू झाल्याचे यातून दिसते.

आधी शिंदेसेनेचा अध्यक्ष करायचे ठरले होते. परंतु, भाजपने ऐन वेळी धोका दिल्याचा शिंदेसेनेचा आरोप आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनुसार तो निर्णय झाला होता. दोन समित्या वाटून घेण्याचे ठरले होते. भाजपने शिंदेसेनेच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरल्यामुळे जि. प.मध्ये उपाध्यक्षपद व भाजपचे सहकार्य नको, अशी भूमिका घेत शिंदेसेनेने निवडणूक प्रकियेवरच बहिष्कार टाकला. शिंदेसेनेकडे २१ सह तीन पुरस्कृत मिळून २४ सदस्य होते. त्यामुळे बहुमत आमचे आहे, असा दावा शिंदेसेनेकडून केला जात होता. ३४ सदस्य शेवटच्या क्षणापर्यंत होते. परंतु, ऐन वेळी सगळी फाटाफूट झाली. २२ सदस्यच शिंदेसेनेकडे राहिले. ३२ सदस्य भाजपकडे आल्याने बिनविराेध विजयी होण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला.

भाजपची दबावतंत्राची रणनीतीएक खासदार, अर्धा डझन आमदार असताना शिंदेसेनेच्या हातून मनपा, जि. प., पं. समित्यांसारखी राजकीय सत्ताकेंद्रे निसटली. भाजपच्या दबावतंत्राच्या रणनीतीपुढे शिंदेसेनेला काहीही करता आले नाही. शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीही या सगळ्या बाबींना कारणीभूत ठरली आहे. जमेल त्या पद्धतीने भाजप सत्ताकेंद्र काबीज करीत जिल्ह्यात पक्षाची पकड मजबूत करीत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच काम करीत असल्याचे दिसते आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Zilla Parishad After Municipal Corporation; Shinde Sena Suffers Setback

Web Summary : BJP secured Zilla Parishad control after municipal victory, sidelining Shinde Sena. Internal conflicts and BJP's strategic pressure led to Shinde Sena's losses in key political centers. BJP strengthens its position for upcoming elections.
टॅग्स :BJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAtul Saveअतुल सावे