छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव, दोन-तीनवेळा निवडून आलेला, पक्ष संघटनेचा अनुभव, लोकप्रतिनिधींसह केंद्र व राज्य शासनाशी समन्वय ठेवण्यासह निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार महापौरपदावर बसेल. यासाठी २ फेब्रुवारीला मुंबईत बैठक होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
२०१५ नंतर भाजपमध्ये इतर पक्षातील अनेकांनी प्रवेश घेतला. सध्या निवडून आलेल्या दावेदारांमध्ये शहर प्रगती आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेनेतून आलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षामध्ये दोन गट पडले आहेत, उमेदवार मूळ भाजपचा की इतर पक्षांतून आलेला देणार, या पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले, काल-परवा आलेला असू द्या किंवा पूर्वी आलेला असू द्या. कमळाचे उपरणे घातले म्हणजे तो आमचा आहे. उमेदवार कुणीही ठरू द्या, निवडून येण्याची क्षमता, संघटन अनुभव, पक्षशिस्त जाणणारा, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवणारा, राज्य व केंद्रांचे निर्णय समजणारा पाहिजे तसेच नगरसेवक म्हणून किमान दोनवेळा तरी निवडून आलेला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन चालणारा, विनम्र, ज्येष्ठ, अनुभवी असा उमेदवार या शहराचा महापौर होईल. यावेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर, आ.अनुराधा चव्हाण, शहराध्यक्ष किशोर शिताेळे आदींची उपस्थिती होती. महापौरपद खुल्या प्रवर्गास सुटल्यामुळे पदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या भाजपमधील इच्छुकांनी नेत्यांसह जे पक्षाशी संबंधित नाहीत, त्यांच्याकडूनही लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नाव होणार निश्चित२ फेब्रुवारी महापौरापदासाठी स्थानिक कोअर कमिटीने निवडलेली नावे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे प्रदेश समितीकडे घेऊन जाणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होऊन नाव निश्चित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भाजपचे ५७ नगरसेवक विजयी झालेले आहेत. त्यातील १० नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. यापैकी कुणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गुणवत्ता, अनुभव, पक्षातील कामाच्या दाखल्यासह इच्छुक नगरसेवक नेते, मंत्र्यांकडे सध्या हेलपाटे मारत आहेत. काही जणांनी दिल्ली, मुंबईतील नेत्यांशीही संपर्क साधल्याची चर्चा आहे.
Web Summary : BJP seeks experienced, twice-elected, and well-connected candidate for Aurangabad mayor. A Mumbai meeting will finalize names after core committee selection and discussions with Chief Minister Fadnavis. Ten councilors are strong contenders.
Web Summary : भाजपा औरंगाबाद महापौर के लिए अनुभवी, दो बार निर्वाचित और अच्छी तरह से जुड़े उम्मीदवार की तलाश में है। मुख्यमंत्री फडणवीस के साथ चर्चा के बाद मुंबई बैठक नामों को अंतिम रूप देगी। दस पार्षद प्रबल दावेदार हैं।