शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सत्तारांच्या सिल्लोडमध्ये भाजप पुन्हा सक्रीय; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, खासदार दानवेंची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 17:30 IST

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात सरकारची आणि संघटनेची ताकद उभी करण्याची ग्वाही

सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजप पुन्हा नव्या जोमाने बळकट करून विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर यांच्या मागे सरकारची व संघटनेची ताकद उभी करू, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे रविवारी रात्री झालेल्या बैठकीत केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जामनेरला नियोजित दौरा होता. जाता जाता त्यांचा सिल्लोड येथे सत्कार करण्याचा बेत भाजप पदाधिकाऱ्यांनी आखला आणि त्याचे पर्यवसान आढावा बैठकीत झाले. रात्री १०:३० वाजता बावनकुळे येथे दाखल झाले. त्यांनी रात्री १२ वाजेपर्यंत बैठक घेतली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेश सचिव किरण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश उपाध्यक्ष एजाज देशमुख, माजी आमदार सांडू पा. लोखंडे, सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर, चेअरमन इद्रिस मुलतानी, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, अशोक गरुड, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, प्रदेश सदस्य अशोक तायडे, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, ज्ञानेश्वर तायडे, गणेश बनकर आदी उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांसहित विरोधकांच्या भुवया उंचावल्यायावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात सरकारची आणि संघटनेची ताकद आम्ही भाजप प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांच्या मागे उभी करू, आपणही त्यांच्या नेतृत्वात काम करा, असे विधान केल्याने आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या व भाजपच्या तिकिटावर किंवा अपक्ष लढण्याची तयारी करणाऱ्या इतर पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकंदरीत आगामी जालना लोकसभा व सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व सुरेश बनकर यांच्याच नेतृत्वात होतील, हे यावरून निश्चित झाले आहे.

टॅग्स :BJPभाजपाAbdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेraosaheb danveरावसाहेब दानवे