शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जन्मदाताच बनला भक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 8:07 PM

पत्नीच्या निधनानंतर पोटच्या मुलीवर चार वर्षांपासून नराधम पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. ७) रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात उघडकीस आली आहे. 

वाळूज महानगर : पत्नीच्या निधनानंतर पोटच्या मुलीवर चार वर्षांपासून नराधम पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. ७) रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या  नराधम पित्याविरुध्द एमआयडीसी  वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय (४२ वर्षे) हा वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीचा कामगार असून तो कुटुंबासह वडगाव कोल्हाटी परिसरात वास्तव्यास आहे. चार वर्षापुर्वी संजय याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो मुलगी रेखा (१५ वर्षे) व मुलगा प्रेम (१२ वर्षे) या दोघांसह एकटाच राहत होता. पत्नीच्या निधनानंतर महिनाभरातच वासनांध संजय याने पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत लगट करण्यास सुरूवात केली. जन्मदात्या पित्याच्या या वागण्यामुळे घाबरलेल्या रेखाने विरोध केल्यानंतर संजय याने मारहाण करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपी संजय हा सतत रेखा हिला धमक्या देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत होता.

आईचे निधन झाल्यामुळे तसेच घरात लहान भाऊ असल्यामुळे रेखा हा अत्याचार मुकपणे सहन करीत होती. अशातच पत्नीच्या निधनानंतर ६ महिन्याने संजय याने दुसरा विवाह केला. दुसरी पत्नी आल्यावर संजय हा पत्नीला मारझोड करुन तिला माहेरी पाठविल्यानंतर पुन्हा रेखा हिच्यावर अत्याचार करु लागला. वडील सावत्र आईलाही मारहाण करुन तिला घराबाहेर हाकलुन देत असल्यामुळे रेखा हिने सावत्र आईलाही वडीलांच्या अत्याचाराची माहिती दिली नाही. दरम्यानच्या कालावधीत रेखा ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना आरोपी पिता तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करीत होता.

अखेर चार वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराची माहिती रेखाने तिच्या लहान भावाला सांगितली. हे ऐकून प्रेमला धक्काच बसला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास आपला सांभाळ कोण करेल, या भितीमुळे दोघा बहिण- भावानी या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही.

यानंतर रेखाची मैत्रीण सुधा व प्रेम या दोघांनी रेखाला धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. जन्मदात्याच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या रेखाने सुधासोबत बुधवारी (दि.७) पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांची भेट घेऊन आपबिती कथन केली. या तक्रारीनंतर पोलीस पथकाने तात्काळ नराधम पिता संजय यास वाळूज एमआयडीसीतून ताब्यात घेऊन जेरबंद केले. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस