पाणीसाठा नसल्याने पक्ष्यांनी फिरवली पाठ
By Admin | Updated: December 23, 2014 00:23 IST2014-12-23T00:23:20+5:302014-12-23T00:23:20+5:30
औरंगाबाद : कमी पावसामुळे पाण्याचा साठा कमी झाला, त्यामुळे पाणपक्ष्यांच्या संख्येतही मोठी घट झाल्याची धक्कादायक माहिती वन विभागाने रविवारी केलेल्या पाणपक्षीगणनेतून समोर आली आहे.

पाणीसाठा नसल्याने पक्ष्यांनी फिरवली पाठ
औरंगाबाद : कमी पावसामुळे पाण्याचा साठा कमी झाला, त्यामुळे पाणपक्ष्यांच्या संख्येतही मोठी घट झाल्याची धक्कादायक माहिती वन विभागाने रविवारी केलेल्या पाणपक्षीगणनेतून समोर आली आहे.
जायकवाडी, सुखनासह जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणी ही गणना करण्यात आली. पाणीसाठे कमी झाल्याने जायकवाडीसारख्या प्रकल्पावर येणाऱ्या पाणपक्ष्यांची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी घटल्याची माहिती पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली.
सुखना येथे पाच वर्षांपूर्वी १५०० फ्लेमिंगो यायचे. या गणनेत ही संख्या केवळ ७०वर आल्याचे स्पष्ट झाले. पाणीसाठा कमी होण्यासोबतच तलावातील अतिक्रमण, पाण्याचा बेसुमार उपसा याचाही परिणाम झाला आहे. ४
फ्लेमिंगो - २५०
४रंगीत करकोचा - ४५
४पानभिंगरी - १५००
४पाणकावळे - ४०००
४हंस - ४५०
४आभोळी - ३५००
४चांदवा बदक - ४०००
४पाणडुबी - ३५००
४तलवाट बदक - १५००
४लालसरी बदक - २०००
४सूरय - ४५००
४चिखल्या - २०००
४तुतवार - ३०००
४परी बदक - ५००४
मच्छीमारांनी पाण्यात लावलेले जाळे अनेक वेळा मच्छीमारांच्या जिवावर बेतते. जायकवाडी पंपिंग स्टेशनवर अशाच एका जाळ्यातून किशोर पाठक आणि डीएफओ सुनील ओव्हळ यांनी दोन पक्ष्यांची सुटका केली.
४या गणनेत मिलिंद गिरधारी, ए.व्ही. बिडवे, आरएफओ कापुरे, अथर्व कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. ४
ढेकू - १२०० पक्षी
(अत्यल्प पाणी)
४शिवना टाकळी - ४००
(२५ टक्के पाणी)
४सुखना - ३०००
(५ टक्के पाणी)
४सांजूळ - २००
(४० टक्के पाणी)
४अंधारी - ३००
४तोंडापूर - १८०
४अंबाडी - २४०
४गडदगड - ४३००
४पूर्णा नेवपूर - ९००
४टेंभापुरी - ४१०
४घाणेवाडी (जालना) - ६५०