बेशुद्धावस्थेत लांडोर(मोर) आढळल्याने बर्ड फ्लूचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:41+5:302021-02-05T04:09:41+5:30
नेवरगाव : गंगापूर तालुक्यातील वाहेगाव शिवारात बेशुद्धावस्थेत लांडोर (मोर) सापडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी बर्ड फ्ल्यूचा धसका घेतला आहे. या पक्ष्यांची ...

बेशुद्धावस्थेत लांडोर(मोर) आढळल्याने बर्ड फ्लूचा धसका
नेवरगाव : गंगापूर तालुक्यातील वाहेगाव शिवारात बेशुद्धावस्थेत लांडोर (मोर) सापडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी बर्ड फ्ल्यूचा धसका घेतला आहे. या पक्ष्यांची बर्ड फ्ल्यू तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर कुक्कुटपालकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी वाहेगाव- नेवरगाव रोडवरील डॉ. सर्जेराव तिडके यांच्या शेतात लांडोर (मोर) भोवळ येऊन पडलेल्या अवस्थेत आढळून आले. डॉ. तिडके यांनी त्याला उचलून त्यांच्या शेतातील घरात ठेवले, व त्याला अन्न भरविले. या घटनेची माहिती त्यांनी वन विभागाचे अधिकारी सोमनाथ आमले यांना दिली. वन कर्मचारी कविता निकुरे गवळी यांनी घटनास्थळी येऊन लांडोरला ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. महेश उबाळे यांनी त्यावर उपचार करून वन विभागाच्या स्वाधीन करून दोन दिवस निगराणीखाली ठेवण्याचे सांगितले. परिसरात मात्र, बर्ड फ्लूची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले असून त्या पक्ष्याची चाचणी करण्याची मागणी होत आहे.
कोट
लांडोर (मोर) पक्ष्याला पॅरॉलिसीस झाला असल्याने ते पायावर उभी राहू शकत नाही. पंखांनी उडता येत नसल्याने दोन ते तीन दिवस त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
डॉ. महेश उबाळे, पशुवैद्यकीय अधिकारी.
फोटो : १) शेतात बेशुद्धावस्थेत पडलेला लांडोर (मोर) पक्षी.
२) जखमी लांडोर पक्ष्याला अन्न खाऊ घालताना शेतकरी.