शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'जैवविविधता धोक्यात आणली,वादळात उन्मळली'; आता तरी विदेशी झाडांची लागवड थांबवा, निसर्गप्रेमींची कळकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 15:59 IST

अलीकडच्या काळात लावण्यात आलेली ८० टक्क्यांपेक्षाही जास्त झाडे विदेशी जातीची आहेत. यामध्ये ग्लिरिशिडिया, मोहगनी, रेन ट्री, नीलमोहर, पीतमोहर अशा झाडांचा समावेश आहे.

ठळक मुद्देया झाडांवर पक्षी, कीटक, किडे राहू शकत नाहीत तसेच या झाडांखाली वनस्पतीही उगवू शकत नाहीत. ही जैवविविधता नष्ट करणारी झाडे लावू नयेत, असा इशारा निसर्गप्रेमी देत आहेत.

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : फार कष्ट न घेता पटकन वाढतात, उंच होतात आणि डोळ्यांना हिरवी दिसतात, म्हणून अगदी सहजपणे आपल्याकडे विदेशी झाडे लावली जातात; पण ही झाडे जैवविविधता नष्ट करत आहेत. त्यामुळे आतातरी विदेशी झाडांची लागवड थांबवा, अशी विनवणी एकीकडे निसर्गप्रेमी करत आहेत, तर दुसरीकडे मात्र वाढवायला कष्ट लागत नसल्याने कितीही कुचकामी ठरत असली, तरी आपल्याला विदेशी झाडेच हवी आहेत.

त्यामुळे खऱ्या अर्थाने जैवविविधता दिन साजरा करायचा असेल, तर सगळ्यात आधी विदेशी झाडांची लागवड थांबवा, अशी सूचना पर्यावरणप्रेमींनी केली आहे. पृथ्वीवरील जैवविविधता अफाट आहे. तिचा योग्य तो अभ्यास होऊन माहितीचा प्रसार झाला, तर या जैवविविधतेचे संरक्षण करता येईल. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघातर्फे २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. औरंगाबाद शहरातही विदेशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात लावण्यात आलेली ८० टक्क्यांपेक्षाही जास्त झाडे विदेशी जातीची आहेत. यामध्ये ग्लिरिशिडिया, मोहगनी, रेन ट्री, नीलमोहर, पीतमोहर अशा झाडांचा समावेश आहे. या झाडांवर पक्षी, कीटक, किडे राहू शकत नाहीत तसेच या झाडांखाली वनस्पतीही उगवू शकत नाहीत. त्यामुळे ही जैवविविधता नष्ट करणारी झाडे लावू नयेत, असा इशारा निसर्गप्रेमी देत आहेत.

वादळात उन्मळली विदेशी झाडेकिनारपट्टीवर नुकत्याच येऊन गेलेल्या ताैक्ते वादळाच्या प्रलयात अनेक झाडे उन्मळून पडली. यापैकी जवळपास ७० टक्के झाडे ही विदेशी होती. विदेशी झाडांचे लाकूड अतिशय कुचकामी आणि ठिसूळ असते, हे याचे मुख्य कारण. यावरूनही विदेशी झाडे आपल्याकडे तग धरू शकत नाहीत, हे स्पष्ट होते.

फक्त जंगले संरक्षित कराजैवविविधता वाढीस लागण्यासाठी आपल्याला फार काही वेगळे करण्याची गरज नाही. स्वदेशी झाडे टिकली तर निसर्ग आपोआपच तिथे जैवविविधता तयार करत जातो. त्यामुळे आपल्याकडची झाडे, जंगले संरक्षित करा. त्यातील मानवी हस्तक्षेप थांबवा, म्हणजे आपोआपच जैवविविधता वाढीस लागेल. विदेशी झाडे जैवविविधतेला प्रचंड मारक आहेत. त्यामुळे या झाडांची लागवड थांबवली तरीही आपण जैवविविधतेला मोठा हातभार लावू शकतो. विदेशी झाडांच्या लागवडीवर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. तशाप्रकारचा निर्णय औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रासाठीच घ्यावा.- मिलिंद गिरधारी, वनस्पती अभ्यासक

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद