शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गाड्यांचा धुरळा उडवत गोण्यांतून वाटले करोडो रुपये, ५०० कोटींचा 'थर्टी-30' घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 08:01 IST

औरंगाबादेत ३०:३० गुंतवणूक घोटाळा : १ लाख रुपयास ७ ते २५ हजार रुपयांपर्यंत दिलेल्या परताव्याला भुलले शेतकरी; आरोपी म्हणतो, ७० कोटीच घेतले

राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या ३०:३० गुंतवणूक घोटाळ्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांना १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ७ ते २५ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना फसविण्यात आले आहे.

पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव, बोकूड जळगाव तांडे, पाटोदे वडगाव, चिंचोली, जांभळी, निलसगाव, जांभळी तांडा, यासह इतर गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी पैशाच्या आमिषापोटी घोटाळ्याचा मास्टरमाइंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड, त्याचा नातेवाईक साथीदार पंकज शेषराव चव्हाण यांच्याकडे कोट्यवधी रुपये जमा केले. हा घोटाळा ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा असून, आरोपीने ६० ते ७० कोटी रुपये मिळाल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील रहिवासी संतोष राठोड याने ३० एप्रिल २०१३ रोजी १ लाख रुपयांच्या बदल्यात ५ ते ७ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याची योजना सुरू केली होती. योजनेत पहिले तीन महिने परतावा मिळत नसे. चौथ्या महिन्यापासून ठरलेली रक्कम देण्यास सुरुवात केली जात होती. या योजनेतून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा होऊ लागले. त्याने गाडीचा नंबर ३०३०, मोबाइलच्या क्रमांकाचे शेवटचे अंक ३०३० असेच घेतले. त्याच्या एजंटांनीही स्वत:च्या गाड्या, मोबाइल क्रमांकाच्या शेवटी ३०३० नंबर घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे राठोडच्या योजनेला ३०:३० नावानेच ओळखले जाऊ लागले. 

ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांच्या परताव्याचे पैसे देण्यासाठी संतोष राठोड आलिशान गाड्यांचा ताफा घेऊनच गावात जात होता. त्यातून शेतकऱ्यांचा विश्वास बसू लागला होता. डीएमआयसी प्रकल्पाच्या भूसंपादनापोटी मिळालेल्या पैशांतून लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या योजनेत केली.   

असा झाला फुगवटाnमार्च-एप्रिल २०२१ मध्ये थकीत परतावा दिला. तेव्हा ज्यांनी दहा लाख रुपये गुंतवणूक केली, त्यांना अडीच लाख रुपये मिळाले होते. nएजंटांनी परताव्याचे पैसे दिल्यानंतर शेतकरी ते पैसे मूळ रकमेत जमा करण्यास सांगत. त्यामुळे एका महिन्यातच १० लाखांचे साडेबारा लाख रुपये व्हायचे.nत्यातून या घोटाळ्याची व्याप्ती ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

असे फुटले बिंगफेब्रुवारी २०२१मध्ये या घोटाळ्याविषयी वृत्त बाहेर आले. त्यानंतर आरोपी संतोष राठोडने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये परतावा दिला. त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली, मात्र परतावा काही मिळाला नाही. त्यामुळे ज्योती ढोबळे या महिलेने बिडकीन ठाण्यात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी तक्रार दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याने राठोडला जामीन मिळाला. यानंतर २१ जानेवारी २०२२ रोजी दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याची दुसरी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष राठोड यास बेड्या ठोकल्या गेल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस