शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:56 IST

महिला पोलिसांच्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट पाहून त्यांच्यावर वरिष्ठांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.

छत्रपती संभाजीनगर : महिला दिन तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहर व ग्रामीण पोलिसांच्यावतीने गुरुवारी (दि. ६) महिला पोलिसांच्या रॅलीचे आयोजन केले होते. महिला पोलिसांच्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट पाहून त्यांच्यावर वरिष्ठांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.

बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाला ६ मार्च रोजी १० वर्षे पूर्ण झाले. तसेच, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. या निमित्ताने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. पोलिस आयुक्त कार्यालयातून सुरू झालेली रॅली मिल कॉर्नर, बाबा पेट्रोल पंप चौक मार्गे जालना रोडवरून चिश्तिया चौक, बजरंग चौक अधीक्षक कार्यालयात समारोप करण्यात आला.

नेतृत्व केलेल्या बुलेटवरच दंडग्रामीणच्या सहायक पोलीस आयुक्त आरती जाधव आणि शहरातील दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. त्यात जाधव यांच्या बुलेटच्या समोरील नंबर प्लेटवर ‘आबासाहेब’, तर मिरधे यांच्याकडील बुलेटचा नंबर नियमबाह्य लिहिलेला होता. वरिष्ठांच्या सूचनेनंतर दोघींनाही प्रत्येकी ५०० रुपयांच्या दंडाची पावती देऊन जागेवरच हा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस