शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हातगाडीत बाईक, डोक्यावर सिलेंडर; केंद्र सरकारविरोधात हिंगोलीत कॉंग्रेसचे तीव्र आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 15:05 IST

महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याचे आरोप आंदोलकांनी केला.

हिंगोली : देशातील वाढती महागाई थांबवून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, यावेळी आंदोलक हातगाडीत बाईक तर डोक्यावर रिकामे गॅस सिलेंडर घेऊन सहभागी झाले होते.

हिंगोली येथे नाईक पेट्रोलपंपापासून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या आंदोलनास सुरुवात झाली. हातगाड्यांमध्ये दुचाकी वाहन उभे करून हातगाडा ओढण्यात आला. तसेच गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्यात आले. यावेळी मोदी सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहत आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याचे आरोप आंदोलकांनी केला. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेल यांच्या सुचनेनुसार व आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यावेळी जि.प गटनेते दिलीपराव देसाई,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सराफ,तालुकाध्यक्ष शामराव जगताप,न.प गटनेते शेख नेहाल भैय्या,नगरसेवक अनिल नेनवाणी,महिला अध्यक्ष शोभाताई मोगले, माजी जि.प सदस्य केशवराव नाईक,नामदेवराव नागरे,काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे,संजय राठोड तिखाडीकर,नगरसेवक मुजीब कुरेशी,आरेफ लाला,मिलींद उबाळे,बासीत मौलाना,विशाल घुगे,अल्पसंख्यांकसेलचे जिल्हाध्यक्ष साद अहमद,  ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष सुधिर राठोड, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष जुबेर मामु,विठ्ठल जाधव,शेख एजाज,अक्षय डाखोरे,संतोष साबळे,शेख वाजीद,खाजा पठाण,राजु जाधव,प्रकाश कोरडे,विठ्ठल पडघन,नामदेवराव जाधव,ओम भारती,गंगा चौधरी, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या ?देशात पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे.तसेच लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी व राज्यात अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकासान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अश्या विविध मागण्या बाबत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcongressकाँग्रेसInflationमहागाई