दुचाकीचोर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 23:35 IST2016-03-04T23:31:56+5:302016-03-04T23:35:45+5:30
परभणी : शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास ४ मार्च रोजी पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे पोलिसांनी पकडले आहे.

दुचाकीचोर पकडला
परभणी : शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास ४ मार्च रोजी पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे पोलिसांनी पकडले आहे. घटनेनंतर चोवीस तासाच्या आत आरोपीस अटक करण्यात आले.
सावळीराम साहेब शिंदे (वय ३२ रा.पाथरी) यांची दुचाकी नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली होती. या प्रकरणात दुचाकी चोराबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलिसांनी पाथरी येथील सेलू कॉर्नर परिसरात सापळा रचला. ४ मार्च रोजी चोरट्यास दुचाकीसह पकडण्यात आले. ही कारवाई सुरेश डोंगरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, श्याम काळे, किशोर चव्हाण, शंकर गायकवाड, राजेश आगाशे यांनी केली. (प्रतिनिधी)