शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्धचा तक्रार अर्ज महिनाभरापासून ठाण्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:47 IST

पोलिसांची कारवाई करण्यासाठी टाळाटाळ 

ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियानातील घोटाळेबाज कर्मचाऱ्यांना अभयडॉ. अमोल गिते यांना निधीचा घोळ निदर्शनास आला.

औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) निधी घोटाळ्यातील बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी क्रांतीचौक पोलिसांना तब्बल महिनाभरापासून सवड मिळालेली नाही.

जिल्हा परिषद आरोग्य विभागात ‘एनएचएम’मध्ये तत्कालीन कंत्राटी लेखापाल अजय पेरकर याने बँकेतील योजनांचा निधी टप्प्याटप्प्याने स्वत:च्या खात्यावर वळविला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी या विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर निधीचा घोळ त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना सांगितली. पवनीत कौर यांनी ‘एनएचएम’ अंतर्गत निधीच्या अपहाराचा प्रकार मुंबई येथील आरोग्य विभागाच्या आयुक्तांना सांगितला. आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादला पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तब्बल १८ लाख १६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल चौकशी पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला. 

दरम्यान, २८ जानेवारी रोजी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप प्रशासनावर केला. तेव्हा यासंदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने सभागृहात दिले होते. आरोग्य आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर जि. प. प्रशासनाने जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर या दोन्ही बडतर्फ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यांच्याकडून खुलासेही प्राप्त झाले. तत्पूर्वी, कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड यांना वेतन व भत्त्यापोटी २ लाख ३० हजार रुपये देणे होते; परंतु त्यांच्या बँक खात्यावर २३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. नंतर ती रक्कमही बनसोड यांनी ‘एनएचएम’च्या खात्यावर परत जमा केली. या प्रकरणात कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर यांना जबाबदार धरून जिल्हा परिषदेने त्यांना सेवेतून बडतर्फ केले. अलीकडे १८ लाखांच्या या अपहारामध्ये कविता बनसोड यांचा सहभाग नसल्यामुळे विधि सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार जि. प. आरोग्य विभागाने अजय पेरकरविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. परंतु महिनाभराचा कालावधी लोटला, तरी अजूनही पोलिसांनी दोषीविरुद्ध कारवाई केलेली नाही.आता आरोग्य विभाग झाला सतर्कजालना रोडवरील एका बँकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे खाते आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निधीची जमा किंवा काढण्यात येणाऱ्या रकमेचे अधिकार आहेत.मात्र, बँकेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर नोंद नसल्यामुळे रकमा जमा केल्या अथवा काढण्यात आल्याचा ‘एसएमएस’ येत नव्हता. आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी बँकेत आपला मोबाईल नंबर नोंद केला आहे. त्यामुळे बँकेतील व्यवहाराचे नियमित ‘एसएमएस’ येत असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. पूर्वी ‘एसएमएस’ येत नसल्यामुळे सलग तीन वेळा निधीचा अपहार झाला. आता यापुढे अशा अपहारास पायबंद बसेल, असे डॉ. गिते म्हणाले.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदCorruptionभ्रष्टाचारkranti chowkक्रांती चौकPoliceपोलिस