शहरं
Join us  
Trending Stories
1
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
2
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
3
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
4
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
5
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
6
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
7
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
8
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
9
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
10
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
11
Sangli: मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
12
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
13
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
14
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
15
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
16
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
17
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
18
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
19
मायक्रोसॉफ्टची नोकरी गेली, रशियात रस्ता साफसफाई करतोय भारतीय इंजिनिअर; सॅलरी ऐकून थक्क व्हाल
20
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
Daily Top 2Weekly Top 5

Imtiaz Jaleel Attack: एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:02 IST

MIM Imtiaz Jaleel Car Attack: पोलिसांनी सध्या बायजीपूरा भागात कडक बंदोबस्त तैनात केला असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार रॅलीवर बायजीपूरा भागात एका गटाने चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत एक कार्यकर्ता जखमी झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला.

नेमकी घटना काय? 

इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली बायजीपूरा परिसरातून जात असताना सुरुवातीला काही तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी माजी खासदार जलील यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रॅली पुढे गेली, पण रॅली संपताच अचानक काही तरुण जलील यांच्या गाडीच्या दिशेने चाल करून आले. यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. जलील यांनी हा हल्ला कॉँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी केल्याचा आरोप केला.

शिरसाट, सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला हा हल्ला शिरसाट, सावे यांच्या गुंडांनी केल्याचा मोठा आरोप माजी खासदार जलील यांनी केला आहे. ते म्हणाले, ''आमच्यावर एका घोळक्याने हल्ला केला. त्यांना वाटले रॅली रद्द होईल. पण आम्ही गप्प बसणारे नाहीत. त्यांना घाबरून आम्ही शांत बसणार नाही. राजकारणात अशा घटना होत असतात. जे नाराज होते ते आज सभेत दिसतील. पोलिसांनी कारवाई करावी म्हणून सीसीटीव्ही फुटेज आम्ही दिले आहे. पोलिसांनी त्यांचे काम करावे.''

स्वतःच हल्ला करून घेतला, कलीम कुरेशी आक्रमक या हल्ल्याच्या घटनेवर काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी खळबळजनक दावा केला आहे. "जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. हा हल्ला त्यांच्याच माणसांनी केला असून सहानुभूती मिळवण्यासाठी जलील यांनी स्वतःवर हल्ला घडवून आणला आहे," असा आरोप कुरेशी यांनी केला. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रॅली अडविण्याचा प्रयत्न झालादरम्यान, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी या सर्व राड्यास कॉँग्रेस उमेदवार कुरेशी जबाबदार असल्याचा आरोप केला. अशा हल्ल्याची पूर्वकल्पना आम्हाला होती. आम्ही रॅली अडविण्यात आली. माजी खासदार जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, पोलिसांनी माहिती देऊनही त्यांनी योग्य बंदोबस्त ठेवला नाही, असा दावाही एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी सध्या बायाजीपूरा भागात कडक बंदोबस्त तैनात केला असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Imtiaz Jaleel's rally turns violent; attack on vehicle alleged.

Web Summary : Clash erupted at Imtiaz Jaleel's rally in Sambhajinagar. Protesters showed black flags, leading to scuffles. Jaleel alleges Congress involvement; rival denies, accusing Jaleel of staging the attack for sympathy. Police intervened, tension high.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Imtiaz Jalilइम्तियाज जलीलViral Videoव्हायरल व्हिडिओchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर