शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
2
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
3
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
4
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
5
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
6
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
7
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
8
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
10
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
11
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
13
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
14
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
15
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
16
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
17
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
18
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
19
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
20
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगराला मोठा दिलासा; ३७०० एचपी पंपाची चाचणी यशस्वी, पाणीपुरवठा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:04 IST

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या व मंत्री अतुल सावे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे पूर्णत्वाकडे असलेल्या शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. जायकवाडी धरणावरून पाणीपुरवठा करण्यासाठी बसवलेल्या ३७०० हॉर्सपॉवर (एचपी) क्षमतेच्या शक्तिशाली पंपाची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या यशस्वी चाचणीमुळे शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर लवकरच मोठा दिलासा मिळणार असून, पुढील दोन महिन्यांत शहराला सातत्यपूर्ण आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२७४० कोटी रुपयांतून योजना होत आहे. सुरुवातीला १६८० कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली, ही योजना नंतर सुधारित करून २७४० कोटींवर नेली गेली. केंद्र सरकारकडून खा. डॉ. भागवत कराड यांनी १ हजार कोटी रु. मिळविले. या योजनेमुळे शहराला पुढील २५-३० वर्षे नियमित शुद्ध पाणीपुरवठा होईल. पंपाची चाचणी यशस्वी झाल्याने पुढच्या दोन महिन्यांत शहरातील अनेक भागांना नियमित पाणी मिळू लागेल. त्यांनी योजनेच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), महानगरपालिका, कंत्राटदारांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या यशस्वी चाचणीमुळे शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. योजनेचे उर्वरित कामही जलदगतीने पूर्ण होईल आणि मार्च २०२६ पर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

पाणीपुरवठा १७१ एमएलडीपर्यंत वाढेलमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः या योजनेचा सातत्याने आढावा घेऊन अडथळे दूर केले. पालिकेच्या वाट्याच्या निधीसाठी राज्य सरकारने विशेष सहाय दिले. यामुळे योजना वेगाने पुढे सरकली असून, २०२३ मध्ये केवळ १८ टक्के प्रगती असताना २०२५ अखेरपर्यंत ती ८२ टक्क्यांवर पोहोचली. योजनेत जायकवाडी धरणातून पाणी उपसा करण्यासाठी ३७०० एचपी क्षमतेचे अत्याधुनिक पंप बसवण्यात आले. सप्टेंबर २०२५ मध्ये हे पंप बसवण्याचे काम पूर्ण झाले आणि आता त्याची चाचणी यशस्वी झाल्याने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या पंपामुळे कच्च्या पाण्याची वाहतूक २५०० मिमी व्यासाच्या मुख्य पाईपलाईनद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत होईल. योजनेची एकूण क्षमता ३९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) असून, २०५२ पर्यंत शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवेल. सध्या १४५ एमएलडी पाणीपुरवठा होतो, जो लवकरच १७१ एमएलडीपर्यंत वाढेल.- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad Relieved: Water Supply to Increase After Successful Pump Test

Web Summary : Aurangabad's water woes may soon ease. A powerful new pump test succeeded, paving the way for consistent water supply within two months. The project, boosted by government funding, aims for daily water by March 2026, increasing supply to 171 MLD.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी