शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:43 IST

भाजपचे सुरेश बनकर उबाठामध्ये प्रवेश करणार; २०० गाड्यासहित शेकडो भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची उमेदवारी शिवसेनेकडून पक्की मानली जात आहे. त्यांना मात देण्यासाठी ठाकरेसेनेने मोठी खेळी करत थेट भाजपा प्रदेश चिटणीस आणि मागील दोन विधानसभेचे उमेदवार राहिलेल्या नेत्याचा पक्ष प्रवेश निश्चित केला आहे. यानुसार भाजपा नेते सुरेश बनकर स्थानिक शेकडो कार्यकर्त्यांसहित उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी शिवबंधन बांधणार आहेत. यासाठी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून तब्बल २०० गाड्यांचा ताफ्यासह शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामध्ये भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी, १०३ बूथ प्रमुख, ११५ शक्ती प्रमुख, शेकडो पन्ना प्रमुख यांचा समावेश आहे. सत्तारांना शह देण्यासाठी ठाकरेसेनेने थेट भाजपाचा राज्यस्तरीय नेता पक्षात घेत मोठे नियोजन केल्याची चर्चा जोर धरत आहे. 

सिल्लोड विधानसभा मतदार संघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ होता. मात्र २०१९ मध्ये अब्दुल सत्तार यांनी शिवबंधन बांधले होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटली. यावेळी सुद्धा अब्दुल सत्तार यांना शिंदे गटाकडून तिकीट पक्के मानले जात आहे. भाजप-सेना युती असल्याने ही जागा भाजपला सुटू शकत नाही. यामुळे भाजपचे नेते सुरेश बनकर यांनी उबाठा गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने घडामोडींनी वेग घेतला आहे. सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील जवळपास सर्वच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सुरेश बनकर यांच्या मागे उभे असल्याचे दिसते.

लोकसभेत पराभव, स्थानिक भाजपाचा वाढला विरोधजालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे उमेदवारांचे काम न केल्याने सिल्लोडमधून लीड मिळाली नव्हती, यामुळेच रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्याचा आरोप भाजपामधून होत आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सुरेश बनकर यांना पाठबळ देत असल्याचे बोलले जात आहे. अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे हा वाद आता विकोपाला गेला असून सत्तार यांना मात देण्यासाठी दानवे यांनी बनकर यांना ठाकरेसेनेत पाठविण्याची खेळी खेळल्याची चर्चा आहे. मात्र, मुरब्बी राजकारणी मंत्री अब्दुल सत्तार आता कोणता पत्ता खेळतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सत्तारांचा विजयी रथ रोखणार का?गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदार संघातून अब्दुल सत्तार तीन वेळा निवडून आले आहेत. २००९ व २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर तर २०१९ मध्ये शिवसेना (उद्धव गट) कडून असे तीन वेळा सत्तार विधानसभेत गेले आहेत. त्यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर, २००९ व २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश बनकर यांचा पराभव केला होता. आता यावेळी ते चौथ्यांदा निवडून येतात की त्यांचा विजयी रथ रोखण्यात ही रणनीती कामी येते हे आगामी काळात दिसणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sillod-acसिल्लोडBJPभाजपाShiv Senaशिवसेनाmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAbdul Sattarअब्दुल सत्तारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर