छत्रपती संभाजीनगर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठपैकी पाच जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद महिलांकडे जाणार आहे. साधारणपणे चार वर्षांपूर्वी झालेल्या सोडतीमध्ये मराठवाड्यातील पाच महिला अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत मराठवाड्यातील आठ जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३ आणि अनुसूचित जातीसाठी २ अध्यक्षपदे जाहीर झाली आहेत.
२०२२ पासून जिल्हा परिषदांवर प्रशासकराज आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी जि. प. अध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदासाठी काढलेल्या सोडतीची अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली.
असे आहे आरक्षण :छत्रपती संभाजीनगर : सर्वसाधारणजालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)बीड : अनुसूचित जाती (महिला)हिंगोली : नागरिकांचा मागास प्रवर्गनांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)धाराशिव : सर्वसाधारण (महिला)लातूर : सर्वसाधारण (महिला)परभणी : अनुसूचित जाती
प्रवर्ग संख्या : सर्वसाधारण- ३, नागरिकांचा मागासवर्ग - ३, अनुसूचित जाती- २