शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
2
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
3
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
4
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
5
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
6
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
7
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
8
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
9
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
10
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
11
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
13
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
14
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
15
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
16
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
17
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
18
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
19
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
20
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! रेल्वे दुहेरीकरण अधिसूचनेने छत्रपती संभाजीनगरात २९२८ मालमत्ताधारक धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:21 IST

अधिसूचनेत २९२८ मालमत्ताधारकांची नावे; मुळात जमीन लागणार केवळ २० ते २२ हेक्टर

- विकास राऊत / श्रीकांत पोफळेछत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते परभणीपर्यंत सुमारे १७७ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी २० गावांतील सुमारे २१ ते २२ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवारी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेत जवळपास १४४ च्या आसपास गट व सर्व्हेमधील २९२८ मालमत्ताधारकांची नावे आल्यामुळे आपली मालमत्ता रेल्वेमार्ग रुंदीकरणात जाणार की काय, या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. त्यांनी आज दिवसभर जायकवाडी प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात फोन करून अनेकांनी भंडावून सोडले. तर, दुसरीकडे या भूसंपादनावर राजकीय नेत्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शहरातून रेल्वेस्टेशन ते मुकुंदवाडीदरम्यान १२५ च्या आसपास गृहनिर्माण संस्था व नागरिकांची घरे आहेत. त्यांच्यात जास्त संभ्रमाचे वातावरण आहे. नागरिकांनी यासाठी संघर्ष समितीदेखील गठित केली आहे.

उपजिल्हाधिकाऱ्याऱ्यांचे स्पष्टीकरण असे...भूसंपादन कायदा २० (अ) प्रमाणे प्राथमिक अधिसूचना काढली आहे. रेल्वेच्या एका लाइनसाठी अधिग्रहण होणार आहे. १५ ते २० मीटरपर्यंतची जागा विद्यमान लाइनपासून संपादित होईल. जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत ते भूसंपादन आहे. अधिसूचनेत जेवढ्या मालमत्ताधारकांची नावे आली, त्या सगळ्यांची जमीन जाणार नाही. भूसंपादन होणार, हे कळविण्यासाठी सर्वांची नावे अधिसूचनेत दिली आहेत.  जिल्ह्यातील हद्दीतील जेवढे गट, सर्व्हे क्रमांक त्या २५३९ मालमत्ताधारकांची नावे अधिसूचनेत आली आहेत. ३५० हेक्टर क्षेत्र अधिसूचनेत असले तरी त्यात २० ते २२ हेक्टर जाग संपादित होईल. मोजणी झाल्यानंतर कुणाची किती जमीन जाते हे स्पष्ट होईल, असे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन जायकवाडी प्रकल्प) एकनाथ बंगाळे यांनी सांगितले.

भूसंपादनप्रकरणी सामूहिक हरकतीजिल्हा प्रशासनाची हद्दीतील शेकटापर्यंत २१ ते २२ हेक्टरचे भूसंपादन होणार आहे. प्रक्रियेबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी करणाऱ्या सामूहिक हरकती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्याकडे गुरुवारी आल्या. भूसंपादन प्रक्रिये अपूर्ण व चुकीची माहिती, नकाशातही स्पष्टता नाही. पर्यायी मार्गाचा अभ्यास नाही, या हरकती डॉ. प्रशांत अवसरमल, गणेश पालवे, नीलेश लोखंडे यांनी घेतल्या.

सार्वजनिक चर्चा करावीरेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने मालमत्ताबाधितांसोबत चर्चा करून संपूर्ण भूसंपादनाबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती द्यावी; तसेच संभाव्य प्रभावित नागरिकांसाठी सार्वजनिक चर्चा आयोजित करावी.- अर्जुन सोळुंके (प्रभावित नागरिक, करमाड)

गाव-गट/सर्व्हे क्रमांक- भूसंपादन (हेक्टरमध्ये) - मालमत्ता धारक

सातारा- ११९- ०.१७०- ४०

सातारा : २- १२८, १४१- ०.२३०५- ३६०

कुंभेफळ- ३९, ४४, २१९, २२१- ०.१३९३- ३२३

लाडगाव- ७- १६६, १६९, २, १७०,१७१, १७२- ०,३४००- ६७

शहानूरवाडी- २१, २६, २९, ३०/१/२,४६- ०.०८९४- ३१८

मुस्तफाबाद- विविध सर्व्हेमधील ३१ प्लॉट्स- ०.०२७९- १७१

शेकटा- ६, ८, १२, ३६, ४४, ३७, ४१- २.०४२२- ५४०

शेंद्रा जहाँगीर- १०६, १०५, १०३/१,१०३/२, १४६, १६०, १६१- २.१७८९- ४७८

हसनाबादवाडी- १३५, १३९, १४०, १४१, १४२, १९३, १९४, १९५, २०१, २०२, २०३, १६४, १६५/१,१६५/२-  २.१९०९- ७६

चिकलठाणा द.- ५७९, ५८०- ०.४५९८- ०८

मुर्तुजापूर- १३/१,१३/२,१३/३,१३/४, १४.१२.११- ०.४५४३- ७६

करमाड- ५, ७, ५८, ८१, ८२, १२२, १३१, २३८, १२- २.५५७५- १८१

फत्तेपूर- १७, २१- ०.५४५१- ६०- मुकुंदवाडी- ५७/१,५७/२- २.२०४२- १०

गारखेडा- ३०, ३१, ३८, ३९- १.४६३६- १२

करंजगाव- १४८, १४९- ०.४२५८- ११

गाढेजळगाव- २९५, २९६/१/२, ३०४/१/२, ३०५, ६, ७, ८, ३४९, ३५२, ३५५, ३७८- १.८३५३- ६५

चिकलठाणा- ४२८, ४२९, ४३९, ४४१, ४२, ४३, ४४, ४५०, ४५९/१/२, ४६३, ४६२/१/२,४६४/१/२, ४८२, ४८६, ४९५, ४९६, ५१९, ५२०, ५२१, ५३३/२, ५३४/२- २.३९४४- ८९

वरूडकाझी- २३८- ०.३१९७- ०९

देमणी- ३६, ३७, ४४, ४५, ४६, ४७, ६०, ६३, ४३- १.७६५६- ३४

English
हिंदी सारांश
Web Title : Railway Doubling Speeds Up; Notification Worries 2928 Property Owners.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway doubling requires land acquisition, causing anxiety among 2928 property owners named in the notification. While 350 hectares are under notification, only 20-22 hectares will be acquired, clarified officials. Affected citizens express concerns demanding transparent information and public discussion regarding the process.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरrailwayरेल्वे