शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नव्या वादाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 17:11 IST

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे.

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. सध्या औरंगाबादचे नामांतर, औरंगजेबाचे पोस्टर, स्टेटस ठेवल्यावरून राज्यभर वाद विवाद होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी येथे भेट दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

राज्यात औरंगजेबावरून वाद पेटत आहेत. स्टेट्स, पोस्टरवरून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जावे, अशी मागणी केली होती. तर केंद्र सरकारने आधी या स्मारकाचा विशेष दर्जा काढून घ्यावा, असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाने दिलं होतं. 

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी सोबत राजकीय समझोता करण्याची तयारी दर्शविलेली आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे. भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट देखील यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

देशाला गुलाम केले त्यांची निंदा करा खुलताबाद ऐतिहासिक शहर आहे, आम्ही येथील मारुती मंदिराला देखील भेटत आहोत. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे त्यांना एकच सांगतो, औरंगजेबाने राज्य केले हे कोणाला मिटवता येणार नाही. बाबासाहेबांनी सांगितले, औरंगजेबाचे राज्य आले जयचंद यांच्यामुळे आले. असे जयचंद येथील अनेक हिंदू राज्यांकडे होते. त्यांना तुम्ही का विरोध करत नाहीत. ज्यांनी देशाला गुलाम केले त्यांची तुम्ही निंदा करा. - प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना