शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली

By राम शिनगारे | Updated: January 22, 2025 12:32 IST

राज्य मंडळाने विभागीय मंडळास सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत,मात्र या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे

छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विभागीय मंडळांसह शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात काळजी घेण्याविषयीचा आदेश काढला. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी, तर दहावीची २१ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचे अभियान राबविण्याचे आदेश दिले . या कॉपीमुक्त अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी, नागरिकांना अभियानाची माहिती देणे, विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ देणे, गैरमार्गाचा अवलंब केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे, परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, अभ्यासाच्या तयारीची चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविणे, जनजागृती फेरी काढणे, ग्रामसभा बैठक घेऊन त्यात माहिती देण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शिक्षक, कर्मचाऱ्यांवर आक्षेपपरीक्षा पारदर्शक पणे पार पाडण्यासाठी ज्या शाळेतील विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती इतर शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांंमधून कराव्यात, अशा सूचनाही दिल्या आहेत.

...तर शिक्षक बहिष्कार घालणारकॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्यावर अविश्वास दाखविणारी अट रद्द न केल्यास परीक्षेवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाने दिला. याविषयीचे निवेदन विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना दिले. यावेळी महासंघाचे युनूस पटेल, वाल्मीक सुरासे, मनोज पाटील, सुनील जाधव, सुजाता पवार, विजयमाला मोळवणे यांची उपस्थिती होती.

अंमलबजावणी होणारराज्य शासनाने परीक्षेसंदर्भात अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य मंडळाकडून प्राप्त सूचनांची अंमलबजाणी विभागीय मंडळाकडून करण्यात येईल.-अनिल साबळे, अध्यक्ष, विभागीय मंडळ

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाssc examदहावीEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर