शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:57 IST

पराभूत उमेदवारांनी घेतली न्यायालयात धाव; कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका?

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी विजयी उमेदवारांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या आहेत. निवडणूक याचिका दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही घेतलेल्या आक्षेपांची निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मतदार यादीतून वगळण्यात आलेली आणि नव्याने समाविष्ट केलेली नावे, प्रचारादरम्यान तसेच मतदान प्रक्रिया सुरू असताना झालेला आचारसंहितेचा भंग आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका?-औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून विजयी झालेले संजय शिरसाट यांच्या विरोधात राजू शिंदे-परळीतून विजयी झालेले धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे-आष्टीचे आमदारसुरेश धस यांच्याविरुद्ध महेबूब शेख-घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांच्याविरुद्ध राजेश टोपे-बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्याविरुद्ध बबलू चौधरी-भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्याविरुद्ध चंद्रकांत दानवे-परांडा येथील आमदार तानाजी सावंत यांच्याविरुद्ध राहुल मोटे-जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध कैलास गोरंट्याल-लातूरचे आमदार रमेश कराड यांच्याविरुद्ध सर्जेराव मोरे-केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्याविरुद्ध पृथ्वीराज साठे-उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्याविरुद्ध सुधाकर भालेराव-वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्याविरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर-अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्याविरुद्ध विनायकराव पाटील-धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांच्याविरुद्ध प्रवीण चौरे-पारोळाचे आमदार अमोल पाटील यांच्याविरुद्ध सतीश पाटील

अहिल्यानगर जिल्ह्यातून आठ याचिकाअहिल्यानगर जिल्ह्यातून आठ जणांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. यात संगमनेरचे आमदार अमोल खटाव यांच्याविरुद्ध बाळासाहेब थोरात, कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध राम शिंदे, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध अभिषेक कळमकर, शेगावच्या आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्ध ॲड. प्रताप ढाकणे, राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध प्राजक्त तनपुरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याविरुद्ध अमित भांगरे, पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांच्याविरुद्ध राणी लंके यांनी आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्याविरुद्ध संदीप वरपे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धसSanjay Shirsatसंजय शिरसाटMLAआमदारAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठElectionनिवडणूक 2024