मोठी बातमी! प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांचा राजीनामा; कुलगुरूंकडून तात्काळ कार्यमुक्त

By राम शिनगारे | Updated: April 6, 2026 19:44 IST2026-04-06T19:43:05+5:302026-04-06T19:44:30+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा; मोठे कारण आले समोर

Big news! BAMU University Pro-Vice Chancellor Dr. Walmik Sarwade Resigns; Now joins Mumbai University | मोठी बातमी! प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांचा राजीनामा; कुलगुरूंकडून तात्काळ कार्यमुक्त

मोठी बातमी! प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांचा राजीनामा; कुलगुरूंकडून तात्काळ कार्यमुक्त

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी प्रकुलगुरू पदाचा राजीनामा सोमवारी (दि.६) दुपारी दिला आहे. कुलगुरूंनी राजीनाना मंजुर करीत त्यांना कार्यमुक्त केले. डॉ. सरवदे हे मुंबई विद्यापीठातील डॉ.आंबेडकर केंद्रात प्राध्यापक म्हणून रुजू होत आहेत.

विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी सोमवारी तातडीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर पदाचा राजीनामा कुलगुरूंकडे सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी हा राजीनामा स्विकारत पुढील कार्यवाहीसाठी कुलसचिव कार्यालयाकडे पाठविला. त्यानंतर डॉ. सरवदे यांना कार्यमुक्त करण्यात आले. डॉ. सरवदे यांनी वयाची ६० वर्ष पूर्ण केल्यापासूनच ते प्रकुलगुरूपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला तीन महिन्यात राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर १५ एप्रिलपर्यंत राजीनामा देणार असल्याचे बाेलले जात होते. मुंबई विद्यापीठातील डॉ. आंबेडकर केंद्रात प्राध्यापकपदाच्या मुलाखती १ एप्रिल राेजी झाल्या. त्यात डॉ. सरवदे यांनी प्राध्यापकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रभारी प्रकुलगुरू म्हणून डॉ. सरवदे यांची नियुक्ती केली होती. मात्र, काही दिवसातच त्यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर विविध संघटनांनी त्यांच्याकडे पदभार देण्यासाठी आंदोलने केली. त्यानंतर पुन्हा डॉ. सरवदे यांची प्रकुलगुरूपदी नियुक्ती केली. त्यास दोन वर्षाची कालावधी उलटताच पुन्हा त्यांनी राजीनामा दिला आहे.

प्रकुलगुरूंना कार्यमुक्त केले
विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांची मुंबई विद्यापीठातील डॉ. आंबेडकर केंद्रात प्राध्यापकपदी निवड झाली आहे. त्याठिकाणी रूजू होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. तो मंजूर करीत कार्यमुक्त केले आहे.
-डॉ. प्रशांत अमृतकर, कुलसचिव

आनंदाने राजीनामा दिला
मुंबई विद्यापीठातील डॉ. आंबेडकर केंद्रात पाच वर्षांसाठी प्राध्यापकपदी निवड झाली आहे. त्या पदाला ‘यूजीसी’चा स्केल असून, प्रकुलगुरूपदाचा आनंदात राजीनामा दिला. आता मुंबई विद्यापीठात रूजू होणार आहे.
-डॉ.वाल्मिक सरवदे, मावळते प्रकुलगुरू

Web Title : डॉ. वाल्मिक सरवदे ने प्रो-वाइस चांसलर पद से इस्तीफा दिया, मुंबई विश्वविद्यालय में शामिल

Web Summary : डॉ. वाल्मिक सरवदे ने मुंबई विश्वविद्यालय में प्रोफेसर के रूप में शामिल होने के लिए डॉ. बाबासाहेब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के प्रो-वाइस चांसलर पद से इस्तीफा दे दिया। अटकलों के बाद उनका इस्तीफा स्वीकार कर लिया गया।

Web Title : Dr. Walmik Sarwade Resigns as Pro-Vice-Chancellor, Joins Mumbai University

Web Summary : Dr. Walmik Sarwade resigned as Pro-Vice-Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University to join Mumbai University as a professor. His resignation was accepted after a brief period of speculation.