शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

मोठी बातमी! ऑरिक बिडकीनला ९०० मि.मी. व्यासाच्या स्वतंत्र जलवाहिनीद्वारे होणार पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:13 IST

शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी ४२ टक्के पाणी हे सांडपाणी प्रक्रिया करून वापरण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉअर (डीएमआयसी)चा एक टप्पा असलेल्या ऑरिक या स्मार्ट इंडस्ट्रिअल सिटीच्या शेंद्रा व बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील ९० टक्के भूखंड विविध कंपन्यांना वाटप केले आहेत. बिडकीन औद्योगिक क्षेत्राला ७२ एमएलडी पाणी जायकवाडीत राखीव केले आहे. ऑरिकने जायकवाडी प्रकल्प ते बिडकीनपर्यंत ९०० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले. ऑरिक सिटीतील औद्योगिक, निवासी आणि कमर्शिअल आस्थापना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल तेव्हाची गरज लक्षात घेऊन जायकवाडी प्रकल्पातील १०० एमएलडी पाणी राखीव ठेवले आहे.

शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी ४२ टक्के पाणी हे सांडपाणी प्रक्रिया करून वापरण्यात येणार आहे. सध्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी ३० एमएलडी पाण्याचा एमआयडीसीसोबत ऑरिकने करार केलेला आहे. मात्र, सध्या ऑरिक शेंद्र्यासाठी केवळ साडेचार एमएलडी पाण्याची गरज भासत आहे, तर बिडकीनमध्ये सध्या दाखल झालेल्या कंपन्यांना १ एमएलडी पाण्याचा एमआयडीसीकडून पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील बिडकीन क्षेत्राचा होणारा विस्तार लक्षात घेऊन ऑरिकने ७२ एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासाठी जायकवाडी प्रकल्प ते बिडकीनपर्यंत ९०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम ऑरिकने हाती घेतले आहे. जानेवारी महिन्यात जलवाहिनीसंदर्भात निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन क्षेत्रासाठी सध्या एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी घेण्याचा करार करण्यात आलेला आहे. मात्र, शेंद्र्यासाठी सध्या केवळ चार ते साडेचार एमएलडीच पाणी लागते, तर बिडकीनला आज केवळ १ एमएलडी पाण्याची मागणी आहे. बिडकीन औद्योगिक पट्ट्यात मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प साकारण्याचे काम सुरू आहे. शिवाय बिडकीनचा भविष्यात आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन बिडकीनसाठी ७२ एमएलडी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. बिडकीनसाठी जायकवाडी येथून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ९०० मि.मी. व्यासाची ही जलवाहिनी टाकून व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.-अरुणकुमार दुबे, प्रकल्प व्यवस्थापक, ऑरिक

English
हिंदी सारांश
Web Title : Auric Bidkin to Get Water via Independent Pipeline: Big News!

Web Summary : Auric Bidkin's industrial zone secures 72 MLD water. A dedicated 900 mm pipeline from Jayakwadi is underway, ensuring future water supply and expansion.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरWaterपाणी