शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी मोठी ‘गुड न्यूज’; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोयोटा’चा २५ हजार कोटींचा प्रकल्प

By यदू जोशी | Updated: July 31, 2024 11:23 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्राथमिक चर्चा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केली आणि प्रकल्पासाठीचे प्रयत्न सुरू झाले.

मुंबई / छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याचे अर्थकारण बदलण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईत बुधवारी परस्पर सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठीचा हा करार असेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्राथमिक चर्चा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केली आणि प्रकल्पासाठीचे प्रयत्न सुरू झाले. चारचाकी मोटारींच्या उत्पादनात जगात अव्वल असलेल्या या कंपनीसमोर गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्र, असे गुंतवणुकीसाठीचे तीन पर्याय होते. मात्र, अखेर त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकल्पात पेट्रोल, डिझेल आणि हरित ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. विशेषत: सहा महिन्यांपासून या प्रकल्पाला गती आली. महाराष्ट्र सरकार आणि कंपनीमध्ये अनेक बैठका झाल्या. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान २० वेळा मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरला भेट दिली. संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवली गेली. आता बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अखेर करार होणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझू योशिमुरा आणि उपाध्यक्ष मानसी टाटा प्रामुख्याने उपस्थित असतील.

२४ हजार जणांना मिळणार रोजगारछत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटी या उद्योगनगरीत एक हजार हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पात ८ हजार जणांना प्रत्यक्ष तर १६ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. या शिवाय, या प्रकल्पाच्या निमित्ताने महत्त्वाच्या ॲन्सिलरिजची (सहायक कंपन्या) उभारणी होईल. २०२७च्या सुरुवातीला या प्रकल्पात पहिली मोटारगाडी तयार होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक या निमित्ताने होणार आहे.

मराठवाड्याचे अर्थकारण बदलेलविदर्भ आणि मराठवाड्याच्या गतिमान विकासासाठी आमच्या सरकारने पुढाकार घेतला आहे. जपानमधील वित्तीय संस्था आणि नामवंत कंपन्यांनी महाराष्ट्राप्रति नेहमीच सहकार्याची भावना बाळगली आहे. त्याचाच परिपाक म्हणून ‘टोयोटा’ची मोठी गुंतवणूक आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. मराठवाड्याचे अर्थकारण या प्रकल्पामुळे बदलेल.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीToyotaटोयोटाDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर